scorecardresearch

महाबळेश्वरहुन वाईला जाणारी जीप कालव्यात कोसळली ; तीन जण गंभीर जखमी!

भरधाव जीपने दुचाकीला व रस्त्यावरील महिलेला धडकही दिली

महाबळेश्वरहुन वाईला जाणारी जीप कालव्यात कोसळली ; तीन जण गंभीर जखमी!

महाबळेश्वरहुन वाईला जाणाऱ्या जीपने दुचाकीला व रस्त्याने चालणाऱ्या महिलेला धडक दिली. त्यानंतर ही जीप धोम धरणाच्या उजव्या कालव्यात कोसळली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले.

आज(बुधवार) दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान महाबळेश्वरहुन वाईला येणारी जीप क्रमांक (एम एच ११ए के ८२१५) किसन वीर महाविद्यालयाच्या पुढे उतारावरून भरधाव वेगात येत असताना, या जीपने एका दुचाकीला मागून धडक दिली. यानंतर रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलेलाही ठोकरले आणि त्यानंतर ही जीप धोम धरणाच्या उजव्या कालव्याच्या कठड्याला धडकून कालव्यात पडली.

या अपघातात दुचाकीचालक, चालणारी महिला व जीपचा चालक गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी कालव्यातून जीप बाहेर काढून पोलीस ठाण्यात लावली आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र हा अपघात झाला तेव्हा या परिसरात गर्दी कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जीपमध्ये एकटा चालकच होता. अन्यथा पाण्याने भरून वाहणाऱ्या कालव्यामुळे मोठा अनर्थ घडला असता. पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी वायदंडे अधिक तपास करत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 20:02 IST

संबंधित बातम्या