सोलापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना अक्कलकोट तालुक्यात तिघा संशयितांकडून तलवारी आणि कोयत्यांचा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे ही कारवाई करण्यात आली.

जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यांमध्ये २९ तलवारी आणि तीन कोयत्यांचा समावेश आहे. बबलिंग पंचाक्षरी बमगोडा याच्या घरात तलवारींचा अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जेऊर येथे त्याच्या घराची झडती घेतली असता, ३० ते ३५ इंच लांबीचे पाते असलेल्या २० तलवारी सापडल्या. त्याची कसून चौकशी केली असता लक्ष्मीकांत काशीनाथ कोळी (रा. चिंचपूर, ता. अक्कलकोट) आणि सुनील बसप्पा कुंभार (रा. तडवळ, ता. अक्कलकोट) या त्याच्या अन्य दोन साथीदारांकडेही शस्त्रांचा साठा असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार कोळी याच्या घरातून पाच तलवारी आणि दोन कोयते हस्तगत करण्यात आले, तर सुनील कुंभार यांच्या ताब्यातून चार तलवारी आणि एक कोयता जप्त करण्यात आला. तिघा जणांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा अधिनियमाखाली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रसाठे असणाऱ्या भागात बातमीदार नेमून कारवाईबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Dispute in Mahavikas Aghadi over election seat allocation in Solapur
सोलापुरात जागावाटपावरून आघाडीत बिघाडी; जिल्ह्यातील चार मतदारसंघांत संघर्ष
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : गरज पडल्यास कुणाचा पाठिंबा घेणार? शरद पवार की उद्धव ठाकरे? फडणवीस म्हणाले, “आम्ही फक्त..”
Washim Constituency, Washim BJP,
VIDEO : भाजपने तिकीट कापले अन् आमदार रडायला लागले; म्हणाले, “पक्षाने माझ्यावर…”
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेसाठी नेहमीच संवेदनशील मानला जातो. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून रक्तरंजित राजकारण केले जाते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या तालुक्यात मोठा शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे स्थानिक राजकारणातील गुन्हेगारीला काही प्रमाणात धक्का बसला आहे.

Story img Loader