उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार वाळवा तालुक्यातील हुबालवाडी येथे शनिवारी सकाळी घडला. अरविंद सदाशिव हुबाले (वय ४७) असे हल्ला झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुदैवाने शेतकरी सावध असल्याने हल्ल्यातून बचावला. मात्र, या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा- सांगली: अश्लील छायाचित्रांची देवाणघेवाण करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला साडेचौदा लाखांचा गंडा

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
bullock cart youth death marathi news
सांगली: शर्यतीवेळी बैलगाड्याच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका

हुबालवाडी येथील शेतकरी हे आज सकाळी ओढ्या काठाला असलेल्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. फडाच्या बाहेर असताना फडामध्ये गुरगुरण्याचा आवाज येत होता. तसेच फडामध्ये काही तरी हालचाल होत असल्याचे दिसले. त्यांनी निरखून पाहण्याचा प्रयत्न केला असता उसाच्या सरीतून  बिबट्यांने त्यांच्या अंगावर झेप घेतली. मात्र, सावध असलेल्या हुबाले यांनी ही झेप चुकवली. याचवेळी दंगा सुरू केला. या दंग्याने जवळच असलेले लोक धावून आले. त्यांनीही आरडाओरडा केला असता बिबट्याने उसाच्या फडात धूम ठोकली. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली आहे. मात्र, बिबट्या उसाच्या फडात परतला असल्याने त्याचा शोध निरर्थक ठरला. रात्रीच्यावेळी असलेली बिबट्याची दहशत आता दिवसाढवळ्याही दिसत असून गावातील शेतकरी धास्तावले आहेत.