रवींद्र जुनारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरात १६ हल्ले करून अनेकांचे बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आलं आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दुर्गापूर परिसरात वन विभागाने या बिबट्याला पकडले आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने अडीच वर्षीय बालिकेला तोंडात पकडून नेलं होतं. मुलीच्या आईने बिबट्याशी झुंज देत लेकीची सुटका केली होती.

या बिबट्याने दुर्गापूर, ऊर्जानगर परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. बिबट्याने लहान मुलांसह मोठ्या माणसांवरदेखील हल्ले करून अनेकांना जखमी केले होते. बिबट्याने तीन जणांचा नरडीचा घोट घेतला होता. काही दिवसांपूर्वी आजोबांच्या अत्यसंस्कराला आलेल्या मुलाचा बळी याच बिबट्याने घेतला होता. तर मागच्याच आठवड्यात आरक्षा नावाच्या मुलीला आपले भक्ष बनविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आईने त्या विपरीत परस्थितीतही हिंमतीने बिबट्यावर काठीने हल्ला करून मुलीचे प्राण वाचवले होते. या घटनेनंतर दुर्गापूरवासियांचा आक्रोश टोकाला गेला व त्यांनी चक्क वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाच कुलूपबंद केले होते.

मुलीसाठी बिबट्यासोबत लढली आई; काठीने हल्ला करत लावलं पळवून; चंद्रपुरातील घटनेची राज्यभर चर्चा

या घटनेनंतर अखेर वन विभागाने बिबट्याला ठार करण्याचे आदेश दिले असतानाच जेरबंद करण्यात यश आलं आहे. ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, वन परिक्षेत्र अधिकारी कारेकर यांच्या टीमने हे काम यशस्वी केले. यासाठी वन विभागाने सहा पिंजरे, कॅमेरा ट्रॅप, तथा ३०० वन कर्मचारी तैनात केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A leopard caught in durgapur of chandrapur sgy
First published on: 13-05-2022 at 10:29 IST