scorecardresearch

नवी मुंबई: कुत्रीवर लैंगिक अत्याचार करणारा विकृत अटकेत

या विकृताला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे

नवी मुंबईतल्या खारघरमधून कुत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला पोलिसांनी अटक केली आहे. मनमोहन कुमार गोवर्धन राम (वय-२०) असे अटक करण्यात आलेल्या विकृताचे नाव आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी एका सजग नागरिकाने याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. खारघरमध्ये राहणाऱ्या विजय रंगारे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला. ज्यामध्ये एक तरुण कुत्रीशी लैंगिक चाळे करत होता. ही जागा त्यांना ओळखीची वाटली. त्यांनी त्यांच्या काही मित्रांना हा व्हिडीओ दाखवला. तेव्हा हा व्हिडीओ खारघरमधलाच असल्याची बाब समोर आली.

सेक्टर चारमधल्या संजू दा धाबाच्या मालकाला हा व्हिडीओ त्यांनी दाखवला कारण हा त्याच जागेतला व्हिडीओ होता. मालकाने व्हिडीओ पाहिला तेव्हा व्हिडीओतला मुलगा मनमोहन असल्याचे त्यांनी ओळखले. त्याला समोर बोलावून दरडावून विचारले असता कुत्रीवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. यानंतर रंगारे आणि त्यांच्या मित्रांनी या मनमोहनला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार १४ ऑगस्ट रोजी घडला आहे. तर १७ तारखेला यासंदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती खारघर पोलिसांनी दिली. खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गुरुवारी या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A man accused of indulging in sexual acts with a dog in kharghar arrested scj

ताज्या बातम्या