आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आणण्यात आले आहे. विविध तपासण्या केल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृती बाबत वैद्यकीय पथक निर्णय घेणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्यायालयाने आमदार राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. पण लता मंगेशकर यांच्या निधनामुळे न्यायालयास सुट्टी असल्याने ती मंगळवारी होणार आहे. या दरम्यान राणे यांना पाठ आणि छातीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना सिंधुदुर्ग रुग्णालयातून आज(सोमवार) सायंकाळी येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
rohit pawar slams ram kadam ashish shelar
“सभागृहात अ‍ॅक्टिंग कशाला करताय? होय, आहे योगेश सावंत आमचा कार्यकर्ता”, रोहित पवारांचा राम कदमांवर हल्लाबोल!

याबाबत पत्रकारांशी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश तांबे यांनी सांगितले की, “सिंधुदुर्ग येथून पुढील तपासणीसाठी आमदार नितेश राणे यांना कोल्हापुरात आणले आहे. येथे त्यांची हृदय,अस्थिरोग विषयक तपासणी करण्याबाबत संदर्भित करण्यात आले आहे. त्यांची रक्त व इतर प्रकारची तपासणी केली आहे. त्याचे अहवाल आल्यानंतर डॉक्टर (फिजिशियन), अस्थिरोग तज्ञ, नाक घसा तज्ञ आदींचे वैद्यकीय पथक उपचाराबाबत निर्णय घेणार आहे.”