शिक्षकाकडे फंडाची रक्कम मिळवून देण्यासाठी २३ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकारे भविष्य निर्वाह निधी विभागातील वरिष्ठ लिपिक मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात पकडला गेला. उत्तम बळवंत कांबळे (रा. टाकवडे वेस, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार हे तक्रारदार हे सेवानिवृत्त आहेत. त्यांची फंडाची रक्कम मिळण्याकरता प्रस्ताव तयार करून तो कोषागार कार्यालय येथे पाठवायचा होता. हे काम भविष्य निर्वाह निधी विभागातील वरिष्ठ लिपिक कांबळे यांच्याकडे होते. लिपिकाने भविष्य निर्वाह निधीतून फंडाचे रक्कम देण्यासाठी 23 हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

हेही वाचा : कोल्हापुरात भाविकांची रीघ ; महालक्ष्मीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

लिपिकाने लाच मागितल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करून आज कांबळे हे लाचेची रक्कम स्वीकारत असताना पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रंगेहात पकडले. अशी माहिती प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A senior clerk who demanded a bribe of rs 23 thousand from a teacher was caught red handed crime kolhapur tmb 01
First published on: 27-09-2022 at 16:51 IST