scorecardresearch

पुणे -बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग प्राण्यांसाठी बनतोय धोकादायक; अज्ञात वाहनाच्या धडकेत सात महिन्याची बिबट मादी ठार

पुणे -बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू होण्याची ही चौथी घटना आहे.

पुणे -बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग प्राण्यांसाठी बनतोय धोकादायक; अज्ञात वाहनाच्या धडकेत सात महिन्याची बिबट मादी ठार
संग्रहित छायाचित्र

अज्ञात  वाहनाच्या धडकेने सात महिन्याची बिबट मादी ठार झाल्याची घटना मध्यरात्री पेठ येथील राष्ट्रीय महामार्गावर घडली. पुणे -बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर बिबट प्राण्याचा हा चौथा अपघाती मृत्यू आहे. परिणामी हा महामार्ग प्राण्यांसाठी धोकादायक बनत चालल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- ठाणे : लायसन्स नसतानाही कार शिकणाऱ्या महिलेनं ब्रेकऐवजी क्लच दाबल्याने डिलेव्हरी बॉय गाडी खाली आला; उपचारापूर्वीच मृत्यू

शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार

पेठ येथे रिलायन्स  पेट्रोल पंपाजवळ अज्ञात  वाहनाने मध्यरात्री बारा वाजणेच्या सुमारास बिबट मादी पिलाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये या पिलाचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती  मिळताच वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले,वन कर्मचारी दीपाली सागावकर, अमोल साठे, प्राणीमित्र युसुफ मणेर यांनी घटनास्थळी जाउन मृत बिबट ताब्यात घेतले. इस्लामपूर कार्यालयामध्ये आणून त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 A seven-month-old female leopard was killed in a collision with an unknown vehicle
अज्ञात वाहनाच्या धडकेत सात महिन्याची बिबट मादी ठार

हेही वाचा- सांगली : लांडग्यांसाठी आटपाडीतील डुबई कुराणाचा संरक्षित वन्य क्षेत्रामध्ये समावेश

या महामार्गावर बिबट्याचे अपघात वाढले असून महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांची धडक बसल्याने अपघात घडत आहेत. काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी एक बिबट्या अपघातामध्ये गंभीर जखमी होउन बेशुध्द पडला होता. त्याला बघण्यासाठी लोकांची गर्दीही झाली होती. मात्र, दुर्घटनेनंतर  २०  मिनीटांनी शुद्धीवर आल्यानंतर त्याने उसाच्या फडात धूम ठोकली. या महामार्गावर पाच किलोमीटर परिसरात आतापर्यंत चार बिबट्यांचा अपघातात बळी गेला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या