घरगुती वादातून मुलाने वडिलांना चाकूने भोसकलं; सातारा शहरातील घटनेमुळे खळबळ

किरकोळ कारणातून घरगुती वादात मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Satara, Crime,
किरकोळ कारणातून घरगुती वादात मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

किरकोळ कारणातून घरगुती वादात मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने मारहाण करत धारदार शस्त्राने वार केल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला. सातारा शहरातील मंगळवार पेठेत ही घटना घडली असून मुलावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बबन पांडुरंग पवार (वय- 56, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सूरज पवार (वय- 28) असे संशयित मुलाचे नाव आहे. याप्रकरणी राजू पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बबन पवार हे त्यांचा मुलगा सूरज याच्यासोबत वास्तव्य करत होते. तक्रारदार राजू पवार हे त्यांचे शेजारी आहेत. बबन पवार व सुरज पवार यांच्यामध्ये घरी वाद सुरु असताना ओरडण्याचा आवाज ऐकून तक्रारदार राजू पवार हे घरात गेले असता सूरज त्याच्या वडिलांना मारहाण करत होता. राजू पवार यांनी बाप-लेकामधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

बाप-लेकामधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या सुरज पवार याने घरातील धारदार चाकूने वडिलांवर वार केला. या घटनेत गंभीर जखमी अवस्थेतील बबन पवार यांना राजू पवार यांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र बबन पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A son killed father in satara sgy