scorecardresearch

कोल्हापूर: भांडणातून तरुणाचा खून; तपास सुरु

जगताप नगरमधील मैदानामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना मृतदेह पडल्याचे आढळून आले. भांडणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोल्हापूर: भांडणातून तरुणाचा खून; तपास सुरु
खून झालेला ऋषिकेश महादेव सूर्यवंशी

कोल्हापूर शहरातील जगतापनगरमध्ये तरुणाचा खून झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (रा. पाचवा बस स्टॉप, फुलेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा- कणकवलीत खासगी बस पलटी होऊन मोठा अपघात; दोन जण ठार, सहा जखमी

जगताप नगरमधील मैदानामध्ये आज सकाळी मुले क्रिकेट खेळत होती. यावेळी एक चेंडू दूरवर गेला. तो शोधण्यासाठी एक लहान मुलगा गेला. तेव्हा त्याला तिथे मृतदेह पडल्याचे आढळले. तो ओरडत पळत सुटला. एका महिलेने त्याला काय झाले विचारला असता त्याने ही घटना घडल्याचे सांगितले. यावरून लोकांना या ठिकाणी खून झाल्याचे कळले. तेथे बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

हेही वाचा- “मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी…..” शिंदे गटाची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका

काही वेळात पोलीस तिथे दाखल झाले. भांडणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई , करवीरचे पोलीस उप अधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 12:37 IST

संबंधित बातम्या