महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे मागील बऱ्याच काळापासून राज्याचे इलेक्ट्रीक व्हेइकल धोरण म्हणजेच इलेक्ट्रीक वाहनांसंदर्भातील नियम निश्चिती, अधिक वापर वाढण्यासंदर्भातील काम करत आहेत. मध्यंतरी त्यांनी पुण्यामधील काही कंपन्यांच्या कारखान्यांना भेटही दिली होती. मात्र आता आदित्य ठाकरे हे सोनी टीव्हीवरील शार्क टँक इंडियावरील एका कार्यक्रमामध्ये आलेल्या इलेक्ट्रीक बाईक बनवणाऱ्या नाशिकमधील कंपनीच्या कारखान्यात पोहचले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा हे फोटो >> Photos: आदिवासी पाड्यातील व्हायरल फोटोची दखल घेत आदित्य ठाकरे थेट नाशिकमध्ये पोहचतात तेव्हा…

आज म्हणजेच २८ जानेवारी रोजी आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी रिव्हॅम्प या कंपनीला भेट दिली. आपल्याला शार्क टँक इंडियामधील क्लिपमध्ये या कंपनीबद्दल माहिती मिळाली. ही कंपनी पूर्णपणे भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रीक बाईक्स बनवते, असं आदित्य आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

नक्की पाहा हे फोटो >> Shark Tank India: कोटीकोटींची गुंतवणूक करणाऱ्या ‘शार्क’ची संपत्ती कितीय पाहिलं का?; सर्वात श्रीमंत आहे…

“काही दिवसांपूर्वीच मला शार्क टँक इंडियामधील एका क्लिपमधून नाशिकमधील रिव्हॅम्प या कंपनीबद्दल कळलं. ही कंपनी पूर्णपणे मेड इन इंडिया इलेक्ट्रीक बाईक्स बनवते. आज मी नाशिकमध्ये असताना या कंपनीच्या टीमला भेटलो. या कंपनीकडून निर्माण केल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर वाढवण्यासाठी आपण एमआयडीसोबत एकत्र काम कसं करु शकतो, याबद्दल या टीमशी चर्चा केली,” असं आदित्य यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “तो फोटो पाहिला, आदेश दिले…”; आदित्य ठाकरे थेट नाशिकमधील त्या आदिवासी पाड्यावर पोहचले अन्…

या ट्विटमध्ये आदित्य यांनी कंपनीच्या इलेक्ट्रीक बाईकचा आणि टीमसोबतचा फोटो पोस्ट केलाय. यावेळेस आदित्य यांच्यासोबत ठाण्याचे पालमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

कंपनीच्या ट्विटर हॅण्डलवरुनही आदित्य ठाकरेंचे आभार कंपनीने मानलेत. “आदित्य ठाकरे तुमच्याकडून पाठिंबा मिळणं हा सुद्धा आमचा गौरव आहे,” असं कंपनीने म्हटलंय.

जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये प्रदर्शित झालेल्या शार्ट टँक इंडियाच्या एका भागामध्ये नाशिकमधील या कंपनीचे संस्थापक आले होते. नाशिककर असणाऱ्या जयेश टोपे, प्रितेश महाजन आणि पुष्कराज साळुंखे या तरुणींनी सुरु केलेल्या रिव्हॅम्प कंपनीला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती. कंपनीची रिव्हॅम्प मित्रा आणि एसएम२५ ही दोन्ही प्रोडक्ट सर्वांनाच आवडली. बोट कंपनीचे सहसंस्थापक अमन गुप्ता आणि शादी डॉट कॉमसाठी ओळखल्या जाणाऱ्या पिपल ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या अनुपम मित्तल यांनी एकत्रितपणे ही गुंतवणूक केलीय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray visited revamp moto startup company who raises inr one cr at shark tank india scsg
First published on: 28-01-2022 at 18:00 IST