scorecardresearch

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॉटेलचे बिल नेमकं भरतंय कोण? आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

या बंडखोर आमदारांचा दैनंदिन अंदाजे खर्च ८ लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Rebel-Shiv-Sena-leader-Eknath-Shinde-with-supporting-MLAs-at-a-hotel-in-Guwahati
बंडखोर आमदार

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हाॉटेलमध्ये थांबले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून हे सगळे बंडखोर आमदार या हॉटेलमध्ये वास्वव्यास आहे. या आमदारांचा एका दिवसाचा खर्च ८ लाख रुपये आहे. भाजपा हा खर्च करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. मात्र, आसामचे मुख्यमंत्री भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपा किंवा आसाम सरकार या बंडखोर आमदारांच्या हॉटेलचे बील देत नसल्याचा दावा सरमा यांनी केला आहे. जर कोणी पाहुणे आसामला आले तर त्यांची गैरसोय होणार नाही किंवा ते सुरक्षित रहावेत यासाठी माझे प्रयत्न असतात. उद्या काँग्रेस किंवा इतर पक्ष आसाममध्ये आले, तर मी अशाच पद्धतीने त्यांचे स्वागत करेन असं सरमा म्हणाले. भाजपा किंवा आसाम सरकार हॉटेलचे बील का देईल? उलट आसामला हॉटेलकडून जीएसटीतून उत्पन्न मिळते. मी शिवसेनेचे आभार मानतो. त्यांच्यामुळे आसाममधील पूराची चर्चा केली जात असल्याचे सरमा म्हणाले.

एका दिवसाचा खर्च ८ लाख रुपये
आसामच्या रॅडिसन ब्ल्यू लक्झरी हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ४० आमदारांसोबत गेल्या ६ दिवसांपासून वास्तव्यास आहेत. तेव्हापासून हे हॉटेल सगळ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. त्यासाठी ५६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. ज्यामध्ये कार्यक्रमासाठीची विस्तृत जागा, एक आऊटडोअर पूल, एक स्पा आणि पाच रेस्टॉरंट आहेत. या बंडखोर आमदारांचा दैनंदिन अंदाजे खर्च ८ लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aasam cm himanta biswa sarma says neither bjp nor assam paying hotel bills of maharashtra rebel mla dpj

ताज्या बातम्या