जळगाव येथे अपघातात दोन ठार, चार जण जखमी

जळगाव – नागपूर महामार्गावरील जळगाव फाट्यावर हा अपघात झाला.

Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news ,
सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर गाडीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव वेगाने जाणार्‍या मालट्रकने समोरून येणार्‍या इंडिगो कारला जोरदार धडक दिल्यामुळे आज (सोमवारी) पहाटे जळगावमध्ये भीषण अपघात झाला. जळगाव – नागपूर महामार्गावरील जळगाव फाट्यावर झालेल्या या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर चार जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये जळगाव येथील दादावाडी परिसरातील सुधीर सोनवणे व धुळ्यातील गणेश फुलपगारे यांचा समावेश आहे. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघात प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accident at jalgaon nagpur highway 2 dead 4 injured

ताज्या बातम्या