यवतमाळमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, १३ प्रवासी गंभीर जखमी | Accident between ST Bus and Car in Yavatmal many dead and injured | Loksatta

यवतमाळमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, १३ प्रवासी गंभीर जखमी

यवतमाळमध्ये रविवारी (४ डिसेंबर) एका एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

यवतमाळमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, १३ प्रवासी गंभीर जखमी
यवतमाळमध्ये अपघात (फोटो सौजन्य – आरएनओ)

यवतमाळमध्ये रविवारी (४ डिसेंबर) एका एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. कार अमरावतीकडे जात होती, तर एसटी बस यवतमाळकडे जात होती. यावेळी यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ कार आणि बसची भीषण धडक झाली.

या घटनेत राजेश इंगोले (यवतमाळ), रजनी इंगोले (यवतमाळ), वैष्णवी गावंडे (वाशिम) आणि सारीखा चौधरी (पुसद, यवतमाळ) या चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील चौघे जागीच ठार झाले. बसमधील १३ जण गंभीर जखमी झाले.

हेही वाचा : धुळे: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; दोघांचा मृत्यू तर २५ जण जखमी

नेर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 15:33 IST
Next Story
नूतन वर्षाच्या शुभेच्छा देताना जरा जपून; ‘तुका म्हणे’ हा शब्द प्रयोग केल्यास होणार कडक कारवाई