नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील तताणी, श्रृंगारवाडी येथून नाशिकच्या दिशेने शेतकऱ्यांसह भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअप (MH 41AU 2192) आणि एका लग्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. लग्झरी बस (RJ 27 PB 26580) नाशिककडून सापुताराकडे जात होती. यावेळी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव जवळील चिखली येथे पिकअपला जोरदार धडक दिली.

पिकअपमधील तताणी, शृंगारवाडी व घागरबूडा गावातील तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तताणी येथील एकाचा रूग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. काही गंभीर जखमी आहेत. तताणी गावातील दोन तरूण शेतकऱ्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. अपघात इतका भीषण होता की पिकअपच्या चालकाच्या बाजूकडील मागचा साटा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
domestic gas in Panvel
पनवेलमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

हेही वाचा : अहमदनगरमध्ये वादळी पावसाने घर कोसळलं, संगमनेरमधील एकाच घरातील तिघांचा मुत्यू

या घटनेची माहिती कळताच घरचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती कळताच सूरगाणा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची चौकशी करून पिकअपमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बोरगाव येथे हलविण्यात आले. या घटनेतील बसचालक सुरगाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेची पुढील चौकशी सूरगाणा पोलीस करत आहेत.