जळगावात दोन एसटींची टक्कर, ३ जण ठार

दोन्ही बस पाचोरा-जळगाव या मार्गावर धावणाऱया होत्या.

संग्रहित छायाचित्र
जळगाव तालुक्यातील वावडदाजवळ दोन एसटी बस समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात ३ ठार, तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही बस भरधाव वेगात असल्याने अपघात फार भीषण होता. दोन्ही बस पाचोरा-जळगाव या मार्गावर धावणाऱया होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Accident in jalgaon three dead

ताज्या बातम्या