scorecardresearch

शिंगणापूर घाटात अपघात; पाचशे फूट खोल दरीत गाडी कोसळून मायलेकरांचा मृत्यू

अपघातानंतर शिखर शिंगणापूर येथील स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले.

शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात आज सकाळी पाचशे फुट खोल दरीत गाडी कोसळून अपघात झाला. शिखर शिंगणापूरहुन नातेपुतेकडे जात असताना भवानी घाटात गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडीतील एक महिला आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला.माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या भवानी घाटात ही घटना घडली.

या अपघातात गजानन सर्जेराव वावरे (वय ५८) व त्यांच्या आई हिराबाई सर्जेराव वावरे (वय ७५) अशी मृतांची नावे आहेत.शिखर शिंगणापूर येथील स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले.

ते थदाळे (ता. माण) येथील रहिवासी आहेत. सध्या नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी सोमवारी थदाळे या आपल्या मूळगावी आले होते. आज सकाळी गजानन वावरे व त्यांची वृद्ध आई हे दोघेजण नाशिककडे जात असताना शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात पाचशे फूट खोल दरीत त्‍यांची गाडी कोसळली. शिखर शिंगणापूर येथील स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले.

गजानन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. गाडीत दोघेच प्रवास करत होते. अपघातानंतर शिखर शिंगणापूर येथील स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले. दोघांना उपचारासाठी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात नातेपुते पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accident in satara district shinganapur one died vsk

ताज्या बातम्या