मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी ७ ते ८ वाहनांनी धडक दिली आहे. शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला असून यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. आज रात्री ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश सेंधवा कडून शिरपूरकडे येत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडला असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

new phase of Samruddhi Highway, bharvir, igatpuri, Monday
समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा सोमवारपासून सेवेत, आता इगतपुरीपासून थेट…
one man dead 2 injured after hitting a bike on highway
महामार्गावर दुचाकीला ठोकरल्याने १ तरुण ठार, २ जखमी
Mumbai-Ahmedabad National Highway
पालघर : राष्ट्रीय महामार्गावर अपघात, वाहतूक विस्कळीत; संत्रा वाहतूक करणारी गाडी उलटली
Latur-Tembhurni highway to be four-lane soon Union Road Transport Minister Nitin Gadkari announced
लातूर-टेंभुर्णी महामार्ग लवकरच चारपदरी, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

या विचित्र अश्या भीषण अपघातात एकामागून एक असे ७ ते ८ वाहनांनी मागच्या बाजूने धडक दिली. यात तिन ते चार चारचाकी वाहनांचा तर काही ट्रकांचा समावेश आहे. या घटनेत चारचाकी वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा देखील घटनास्थळी हजर आहे.