मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात; चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी ७ ते ८ वाहनांनी धडक दिली आहे. शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला असून यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. आज रात्री ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश सेंधवा कडून शिरपूरकडे येत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडला असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

या विचित्र अश्या भीषण अपघातात एकामागून एक असे ७ ते ८ वाहनांनी मागच्या बाजूने धडक दिली. यात तिन ते चार चारचाकी वाहनांचा तर काही ट्रकांचा समावेश आहे. या घटनेत चारचाकी वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा देखील घटनास्थळी हजर आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accident on mumbai agra national highway four people are likely to have died srk

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी