scorecardresearch

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; महिलेसह चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे भीषम अपघात घडला असून या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; महिलेसह चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात भीषण अपघात

काही दिवसांपुर्वीच थाटामाटात उदघाटन करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. दुर्दैवाने मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश असल्याचे कळते. दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. गाडीतील प्रवासी हे नागपूरचे असल्याचे कळते. मुंबईहून नागपूरकडे प्रवास करत असताना अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, मृत मुलगी गाडीबाहेर उडून काही फूट अंतरावर जाऊन पडली, असे स्थानिकांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. अपघात झाला त्यावेळी गाडीत चारजण उपस्थित होते.

हे ही वाचा – ‘समृद्धी’वर १० दिवसांत २९ अपघात; एकाचा मृत्यू, ३३ जखमी

बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ११ डिसेंबर रोजी जाले. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नागपूर ते शिर्डी प्रवास करत या मार्गाची चाचणी केली होती. या संपूर्ण महामार्गाची बांधणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने केली आहे. असं असतांना हा महामार्ग वाहतुकीकरता सुरु झाल्यावर या मार्गावरील पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याची गंभीर गोष्ट समोर आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 10:37 IST

संबंधित बातम्या