मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, प्रचंड वाहतूक कोंडी

दोन्ही बाजूस सुमारे २ ते ३ किलोमीटर रांगा लागल्या आहेत.

नागपूर-भंडारा रस्त्यावर डांबर घेऊन जात असलेला टिप्पर (एमएच ३१ सीबी ४१९) रस्त्याच्या मधोमध उभा होता.

मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीजवळ झालेल्या अपघातामुळे दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या कंटेनरला सँट्रो कारने धडक दिली. यामध्ये कंटेनर रस्त्याच्या मधोमध फिरल्यामुळे गोव्याला जाणाऱ्या व मुंबईला येणाऱ्या दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली आहे. या अपघातात २ ते ३ जण जखमी झाली असून यातील एका महिला गंभीर जखमी असल्याचे समजते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस शेकडो वाहने खोळंबली आहेत. दोन्ही बाजूस सुमारे २ ते ३ किलोमीटर रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळित व्हायला आणखी दीड ते दोन तास लागतील असे सांगण्यात येते. शनिवार-रविवार सुटीचे दिवस असल्याने या मार्गावर नेहमीपेक्षा जास्त वाहतूक आहे. त्यातच हा अपघात झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Accident on the mumbai goa highway huge traffic jam