scorecardresearch

Premium

खुनाच्या गुन्ह्यामध्ये तब्बल ३६ वर्षे फरार आरोपीस पकडले; पोलिसांची कराडजवळ कारवाई

कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या दप्तरी नोव्हेंबर १९८७ मध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तब्बल ३६ वर्षे परागंदा इसमास शिताफीने पकडण्यात आले आहे.

Accused absconding for 36 years was caught
खुनाच्या गुन्ह्यामध्ये तब्बल ३६ वर्षे फरार आरोपीस पकडले

कराड : कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या दप्तरी नोव्हेंबर १९८७ मध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तब्बल ३६ वर्षे परागंदा इसमास शिताफीने पकडण्यात आले आहे. लाला सिध्दाम तेली (रा. मनव, ता. कराड) असे या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी या संदर्भात दिलेली माहिती अशी की. मनव येथील बाळू सरगर, दत्तू सरगर वगैरे यांनी गावातीलच भीमराव सिध्दाम तेली सन १९८३ मध्ये खून केला होता. या खुनाच्या कारणावरून लाला सिध्दाम तेली, संपत सिध्दाम तेली, महादेव सिध्दाम तेली व दत्तू आण्णा तेली (सर्व रा. मनव) यांनी पाल-खंडोबा (ता. कराड) दत्तू ज्ञानु यालमारे यांचा कोयता, कुऱ्हाड या सारख्या घातक हत्याराने निर्घुण खून केला होता. या गुन्ह्याची नोंद उंब्रज पोलिसात दाखल होता. आणि त्यातील आरोपी लाला तेली हा गुन्हा घडल्यापासून ३६ वर्षे फरार होता.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी कराडमध्ये बंदोबस्तात असताना, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांना खबरीकडून लाला तेली हा मनव गावी आपल्या घरी येणार असल्याची बातमी दिली होती. त्यानुसार बापू बांगर यांच्या सूचनेवरून सहायक पोलीस निरीक्षक नितीन शेळके, फौजदार विश्वास कडव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून लाला तेली यास काल गुरुवारी मध्यरात्री त्याच्या घरातून लाला यास शिताफीने पकडले. आणि उंब्रज पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई फत्ते केल्याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक बापू बांगर यांनी शेळके व कडव यांच्या नेतृत्वखालील पथकाचे अभिनंदन केले आहे.

Goon of Chota Rajan gang
मुंबई : छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक, २९ वर्षांपूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी
Onion auction Nashik district
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्ववत होण्याची चिन्हे, विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात लिलावाला प्रारंभ
Jayant Patil
सांगलीत आर्थिक नाड्या जयंत पाटील यांच्या हाती?
sheep killed wolf attack
सांगली : लांडग्यांच्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार, २० गायब

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused absconding for 36 years was caught in the crime of murder ysh

First published on: 30-09-2023 at 00:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×