अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी हा फरार होता. अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधीच अटक करण्यात आली आहे. ANI ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिक्षा जयसिंघानी ही अनिल जयसिंघानीची मुलगी

अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडे माझे वडील अनिल जयसिंघानी यांना सोडवा अशी मागणी अनिक्षाने केली. त्यासाठी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. ही अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. एवढंच नाही तर अनिक्षाने व्हिडीओ आणि फोटो दाखवून अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला. ही सगळी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी विधासभेत दिली होती. ज्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.

कोण आहे अनिल जयसिंघानी?

अनिल जयसिंघानी हा उल्हासनगरमधला क्रिकेट बुकी आहे

२०१० मध्ये अनिल जयसिंघानी छोटा बुकी म्हणून ओळखला जात होता

२०१० मध्ये बेटिंग करताना अनिल जयसिंघानीला अटक केली गेली होती

१९९५ ला अनिल जयसिंघानीने काँग्रेसच्या तिकिटावर उल्हासनगर पालिका निवडणूकही लढवली होती

२००२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनिल जयसिंघानीने प्रवेश केला

अनिल जयसिंघानीचे बड्या राजकीय नेत्यांशी संबंध, तसेच पोलीस अधिकाऱ्यांशीही चांगले संबंध

अनिल जयसिंघानी हा मागच्या सात-आठ वर्षांपासून फरार होता अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनीच सभागृहात दिली.

अनिल जयसिंघानीच्या विरोधात विविध १५ गुन्ह्यांची नोंद आहे

कोण आहे अनिक्षा?

अनिक्षा जयसिंघानी ही सट्टेबाज अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिलल जयसिंघानीवर महाराष्ट्र, गोवा आणि आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देणं, फसवणूक करणं असे गुन्हे नोंद आहेत. अनिक्षाने कायद्याच्या विषयात पदवी घेतली. स्वतःला डिझायनर म्हणवणारी अनिक्षा १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे. अनिक्षा जयसिंघानी ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. ती कपडे, ज्वेलरी, शूज हे डिझाईन करते. २०२१ मध्ये अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ती भेटली होती. तिने फॅशन विश्वातल्या विविध गोष्टी सांगितल्या आणि अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमृता फडणवीस यांनी अनिक्षाच्या विरोधात जो FIR केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अनिक्षाशी पहिली भेट २०२१ मध्ये झाली होती. अमृता फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की अनिक्षाने त्यांना हे सांगितलं होतं की ती डिझायनर आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना हे सांगितलं की पब्लिक इव्हेंटमध्ये तुम्ही मी डिझाइन केलेले ड्रेसेस आणि ज्वेलरी परिधान करा. त्यामुळे मला माझ्या ब्रांडचं प्रमोशन करता येईल. अमृता फडणवीस यांनी ही बाब मान्य केली. मात्र अमृता फडणवीस यांनी हा आरोप केला आहे की काही कालावधीनंतर अनिक्षाने तिच्या वडिलांच्या साथीने मला धमकी दिली आणि माझ्याविरोधात षडयंत्र रचलं. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांच्या विरोधात IPC च्या कलम १२० बी नुसार आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृता फडणवीस यांनी हा एफआयआर मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला दाखल केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused anil jaisinghani arrested from gujarat by mumbai crime branch for allegedly threatening and blackmailing amruta fadnavis scj
First published on: 20-03-2023 at 12:29 IST