यवतमाळ : सहा वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला तिहेरी जन्मठेपेसह १५ हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा दारव्हा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. ही शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगायची आहे. दारव्हा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ह.ल. मनवर यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. जलदगतीने खटला चालवून अवघ्या दोन महिन्याच्या आत खटला निकाली काढण्यात आला.

संजय ऊर्फ मुक्या जाधव (२४, रा. बोरगाव, ता. आर्णी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने १३ मार्च २०२२ ला सहा वर्षांच्या चिमुकलीस घरात बोलावून तिला चॉकलेटचे आमिष दाखवत अत्याचार केला.

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Chief Minister eknath shinde order on BJPs letterhead ruled illegal by High Court
भाजपच्या ‘लेटरहेड’वर मुख्यमंत्र्याचे आदेश, उच्च न्यायालय म्हणाले, बेकायदेशीर…

हा खटला दारव्हा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ह.ल. मनवर यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. चिमुकल्या पीडितेने न्यायाधीशासमोर उभे राहून खंबीरपणे आपली साक्ष नोंदवली.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी अनिल आडे, आर्णी ठाणेदार पितांबर जाधव यांनी केला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे, सहायक सरकारी वकील अंकुश  देशमुख   यांनी बाजू मांडली. दोन महिन्यांत निकाल याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात आरोपीला अटक करण्यात आली होती. घटनास्थळ पंचनामा, सर्व पुराव्यांची जुळवाजुळव करून उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी हा तपास हाताळला. तांत्रिक व वस्तुनिष्ठ पुरावे यांची सांगड घालून साक्षीदारांचे बयाण तपासात दाखल केले. तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथे पाठपुरावा करून रासायनिक विश्लेषणाचे अहवाल मागवून घेतले. अवघ्या दहा दिवसात तपास पूर्ण करून पुराव्यानिशी आरोपीविरुद्ध २२ मार्च २०२२ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले व जलदगतीने अवघ्या दोन महिन्यात निकाल लागला, अशी माहिती येथील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या गंभीर आणि संवेदनशील बालअत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास विक्रमी वेळेत गुणात्मकरित्या सबळ पुराव्याच्या आधारे पूर्ण केल्याने आरोपीस ऐतिहासिक तिहेरी जन्मठेपेची शिक्षा मिळाली, असे ते म्हणाले. या कामगिरीसाठी तपास पथकाला ५० हजार रुपये रोख बक्षीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी जाहीर केले.