scorecardresearch

भाजपाच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात बोलणाऱ्यावर तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून कारवाई सुरू – पटोले

लोकशाहीला वाचवण्यासाठी न्यायालयाने स्वतःहून हस्तक्षेप करावा, अशी देखील मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

nana patole
(संग्रहीत छायाचित्र)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)आज सकाळी छापेमारी केली. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले होते. जमिनीच्या व्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. चौकशीनंतर ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपावर जोरदार टीका केली. 

“भाजपाचा अत्याचारी व्यवस्थेविरोधात जो कोणी बोलेल त्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून कारवाई केली जाणार आणि तोंड बंद करण्याचं पाप हे भाजपा जाणीवपूर्वक करत आहे.” असा आरोप नाना पटोले यांनी आज(गुरुवार) पत्रकारपरिषदेत केला आहे.

तसेच, “केवळ सतीश उके यांच्याच प्रकरणात नाही तर अनेक प्रकरणात आपण पाहत आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान, गृहमंत्र्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पुराव्यनिशी माहिती दिली होती, त्यावर का कारवाई केली जात नाही? भाजपा हिटलरशाही करत आहे, या देशात लोकसाही संपुष्टात आणून हुकुमशाही आणत आहे. म्हणून मी मीडियाद्वारे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यालायाचे सरन्यायाधीश यांना विनंती करतो की लोकशाहीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करावा, जेणेकरून लोकशाही वाचवण्यात आपल्याला यश येईल. अन्यथा भाजपाच्या हिटरलाशाहीमुळे लोकशाही आता धोक्यात आलेली आहे.” असं देखील नाना पटोले यांनी बोलून दाखवलं आहे.

नागपुरात नाना पटोलेंच्या वकिलाला ईडीने घेतलं ताब्यात; फडणवीसांविरोधात याचिका केल्याने आले होते चर्चेत

याचबरोबर “ वकीलाच्या फाईल्स जप्त करण्यासाठी ईडीचा वापर होतोय आणि यासाठी मुंबईतील ईडीचे अधिकारी केंद्रीय पोलीस दल सोबत घेऊन गेले. नागपुरात देखील ईडीचं कार्यालय आहे परंतु त्यांना याबाबत माहिती नाही. हे दबावतंत्र जे सुरू आहे ते कशासाठी आहे? सतीश उके यांनी अनेक घटनांमध्ये जसं की न्यायमूर्ती लोहीया प्रकरण असेल किंवा अन्य प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. मग यामुळ सतीश उके यांचं तोंड बंद करण्याच प्रयत्न होतोय का? असा देखील प्रश्न निर्माण होतो. म्हणून ईडीची कारवाई कोणावर केली गेली पाहिजे, याचाही स्पष्टपणे कायद्यात उल्लेख आहे परंतु याचा दुरुपयोग केला जात आहे. म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती करतो आहोत. ” असंही नाना पटोले यांनी यावेळी माध्यमांना सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action taken against those who spoke against bjps oppressive system by abusing investigative machinery patole msr

ताज्या बातम्या