अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने हे समाजमाध्यमांवरील पोस्ट्समुळे नेहमी चर्चेत असतात. वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर ते नेहमी भाष्य करत असतात. दरम्यान, गुरुवारी (१३ जून) त्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फेसबूकवर खास पोस्ट केली आहे. या पोस्टची बरीच चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये माने यांनी लिहिलं आहे की, ज्यांचे बापजादे महान, कर्तृत्त्ववान होऊन गेलेत त्यांच्यावर जबाबदारीचं प्रचंड मोठं ओझं असतं. कारण समाजाच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात. मात्र बऱ्याचदा अशा महान लोकांचे वंशज लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडतात. मात्र आदित्य ठाकरे त्यास अपवाद आहेत.

माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, काळानुसार जगण्याची पद्धत बदलत जाते. भवतालातली परिस्थिती बदलत जाते. माणसाचं वागणं-बोलणं बदलत जातं. आज्जा जसा बोलत होता, वागत होता तसं तंतोतंत आपला बाप नसतो… आणि आपण बापासारखे वागणारे-बोलणारे नसतो. जुन्यातलं नेमकं काय घ्यायचं, काय टाकायचं…आणि घेतलेलं नव्याशी कसं जोडायचं हे ज्याला कळलं तो घराण्याचं नाव काढतो!

Mahindra SUV discounts in June 2024:
टाटा-महिंद्रकडून ‘एसयूव्ही’च्या किमतीत कपात
aditya thackeray replied to ashish shelar
तेजस ठाकरेंचा ‘त्या’ व्हिडीओवरून आशिष शेलारांची टीका; आदित्य ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
monoj jarange replied to chandrakant patil
“तुम्हाला नातेवाईक आणि सगेसोयरे यांच्यातील फरक कळतो का?” मनोज जरांगेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर!
Anant Ambani Radhika Murchant Varun Grovar
“राजेशाही अराजकता निर्माण करते”, अनंत अंबानींच्या लग्नावरून लेखक वरूण ग्रोव्हर यांची जळजळीत टीका
What Eknath Shinde Said?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर २’ चित्रपटात दिसणार? पोस्टर लाँचच्या वेळी सचिन पिळगावकरांच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा
legendary bharatanatyam dancer c v chandrasekhar
व्यक्तिवेध : सी. व्ही. चंद्रशेखर
chhagan bhujbal latest news
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “बोलताना जरा…”
aamir khan mahatma Gandhi
आमिर खान म्हणतोय, “गांधी विचारांचा माझ्यावर प्रभाव”; सेवाग्राम आश्रमाला भेट

“ज्यांचे बापजादे महान, कर्तृत्त्ववान होऊन गेलेत, त्यांच्यावर तर जबाबदारीचं प्रचंड मोठं ओझं असतं. कारण समाजाच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात. लोक त्यांच्यात महामानव ठरलेल्या त्याच्या पुर्वजाला बघतात. म्हणून त्या अपेक्षा बर्‍याचदा फोल ठरतात. पण लाखात एखादा असा हिरा असतो, जो आपल्या थोर पुर्वजांचं नाव आणखी उंच तर करतोच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवण्याची क्षमता बाळगतो. असाच एक लखलखता सूर्य महाराष्ट्राकडे आहे, ज्याचं नाव आहे आदित्य ठाकरे!

माने यांनी म्हटलं आहे की “प्रबोधनकार ठाकरे हे ज्याचे पणजोबा, प्रबोधनकार म्हणजे वर्चस्ववादी भिक्षुक्यांचा कर्दनकाळ… प्रतिगामी किड जाळणारा पुरोगामी विचारांचा जाळ… बहुजनांना प्रकाशवाट दाखवणारी धगधगती मशाल! …ज्याचे आजोबा होते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. मुंबईतल्या मराठी माणसांचा तारणहार… सिनेनाट्य कलाकारांचा आधार… तमाम हिंदुंच्या काळजातलं भगवं शिवार! आणि ज्याचा बाप आहे द ग्रेट उद्धव ठाकरे. जणू वर्चस्ववाद्यांनी प्रबोधनकारांचा बदला घेण्यासाठी की काय, पण या नातवाला एकाकी खिंडीत गाठला. ज्याला संपवण्यासाठी जबरदस्त सापळा रचला. पण हा ठाकरी वाघ त्या हिंस्त्र लांडग्यांच्या झुंडीला भिडला, नडला, एकेकाला फाडून पुरून उरला! अशी थोर परंपरा लाभलेला हा पोरगा. ‘आदित्य’ हे नांव सार्थ ठरवत दुश्मनांनी रचलेली बदनामीची सगळी कारस्थानं भेदून तेजानं लखलखत वर आलाय. वरवर कोवळ्या दिसणार्‍या या मुलात तिन पिढ्यांचा सगळा अर्क तर आहेच, पण भवतालाचं सखोल भान असलेलं स्वत:चं म्हणून एक संवेदनशील, भक्कम व्यक्तीमत्त्व आहे!”

हे ही वाचा >> “RSS कडून मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग”, संजय राऊतांकडून कौतुक; म्हणाले, “संघ आता…”

किरण माने यांनी लिहिलं आहे की “आदित्य ठाकरे, तुम्ही महाराष्ट्र पिंजून सगळे नवे-जुने शिवसैनिक शिवबंधनाच्या अनमोल धाग्यात बांधलेत. आता आम्ही एकजुटीनं तुमच्याबरोबर आहोत. शिवसेनेच्या घातक्यांना आता निष्ठेची खरी ताकद दाखवूया. समाजातही आणि राजकारणातही विषारी तण माजलंय. सगळी ताकद लावून ते उपटून फेकून देऊया. या महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला शुद्ध बनवू, सुंदर बनवू. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, जय महाराष्ट्र.”