Nana Patekar Unfulfilled Dream House in Murud Janjira : रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिराशी नाना पाटेकर यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. त्यांचे बालपण याच ठिकाणी गेले होते. अधून मधून मुरुडला येत असत,  पाटेकर यांच्या आकस्मात निधनामुळे मुरुड परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे. मुरुड बाबत त्यांची एक इच्छा होती. पण त्यांच्या निधनामुळे अपूर्ण राहिली…

मुरुड जंजिरा हे नाना पाटेकर यांचे आजोळ होते. त्यांचा जन्मही मुरुड जंजिरा येथेच झाला होता. त्यांचे बरेचसे बालपण मुरुड येथेच गेले. इयत्ता चौथी ते सातवी मुरुड नगर पालिकेच्या शाळा क्रमांक चार मध्ये शिकायला होते.

शाळेतील सांस्कृतीक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा, शाळेतील स्नेह संमेलनामध्ये त्यांनी आपल्या अभिनय आणि वक्तृत्वाची चुणूकही दाखवून दिली होती. पुढील शिक्षणासाठी ते नंतर मुंबईत स्थलांतरीत झाले. मात्र मुरुडशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नव्हती. अधून मधून ते आवर्जून मुरुडला येऊन आल्या मित्रपरिवाराला भेटत असत.

मुरुड मधील कला प्रेमींना एकत्र करून त्यांनी कला सागर नावाची नाट्यसंस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या उद्घाटन समारंभालाही ते आवर्जून उपस्थित होते. संघर्ष आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून नाना पाटेकर यांनी सुरवातीला नाट्य आणि नंतर चित्रपट क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनयाने वेगळी छाप पाडली. मात्र मुरुडशी असलेले संबध कधी तुटू दिले नाहीत.

मुरुड नगर पालिकेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या पर्यटन महोत्सवालाही ते एकदा उपस्थित राहीले होते.  मुरुडशी असलेल्या जिव्हाळा लक्षात घेऊन इथे छोटेसे घर बांधण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी प्रयत्नही सुरू केले होते. समुद्रकिनाऱ्याजवळ एक जागाही घेतली होती.  मात्र काही कारणांमुळे मुरुड मध्ये घर बांधण्याची ती इच्छा अपूर्ण राहीली.