रत्नागिरी : आर्ट सर्कल फाउंडेशन आयोजित नाट्य महोत्सव सादर होत आहे. मोटली प्रॉडक्शन्स निर्मित दोन दर्जेदार नाटकांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे. ३ फेब्रुवारीला  “एक दास्तान एक हकीकत” हे नाटक होणार आहे. यात अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांची प्रमुख भूमिका आहे. दोन्ही दिग्गज कलाकार रत्नागिरीत पहिल्यांदाच नाटक सादरीकरण करण्यासाठी  येत आहेत.

हेही वाचा >>> रत्नागिरीत पाडापाडीच्या राजकारणाचा ठाकरे गटाला मोठा फटका, राजन साळवींना ठाकरे यांनी झापले, लवकरच भाजपात प्रवेश

Devendra fadnavis loksatta news
फडणवीसांचे लहानपणीचे ‘गोड’ स्वप्न अखेर पूर्ण झाले!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
How To Make Dahi Mirchi dahi mirchi recipe in Marathi
झणझणीत दही मिरची; दोन भाकऱ्या जास्त खाल या दह्यातल्या मिरचीसोबत, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
संदूक: आव्हानात्मक ‘लायर’
tushar suryavanshi conversation with padamashri sabarmatee
आपल्याला काय हवे? सकस आहार, की दुर्धर आजार?
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
nikki tamboli and samir choughule
Video: निक्की तांबोळी आणि समीर चौघुले यांनी सांगितली चमचमीत बटाटावड्याची रेसिपी; पाहा व्हिडीओ

विविध विषयांवरील चित्रपट करत नसिरुद्दिन शहा यांची अभिनय कारकीर्द बहरलेली राहिली आहे. तर अनवट वाटेच्या नाटके, सिनेमातील चरित्र भूमिका यासोबतच “साराभाई व्हर्सेस साराभाई” या टिव्ही मालिकेमुळे रत्ना पाठक प्रेक्षकांच्या घरा घरात पोहोचल्या आहेत. दोन अत्यंत सशक्त कलाकारांना रंगमंचावर पाहणे हा एक जबरदस्त नाट्यानुभव असणार आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात एनएसडीच्या तालमीतून तावून सुलाखून निघालेले हे दोन तगडे कलाकार या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना रंगमंचावर पाहता येणार आहेत. उत्तमाचा ध्यास घेऊन आयुष्यभर सकस आणि सार्थ काम करत मोटली प्रॉडक्शन्सच्या छताखाली आजवर अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती केली आहे.

हेही वाचा >>> Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी पकडले जात नसतील तर..”, वैभवी देशमुखची आर्त हाक

याच निर्मितीतील आणखी एक विचार करायला लावणारं आणखी एक नाटक ‘औरत औरत औरत’ दिनांक ४ फेब्रुवारीला सादर होणार आहे. याचे दिग्दर्शक खुद्द नसीरुद्दीन शाह असून हिंदी आणि गुजराथी रंगभूमीवरील कसदार अभिनेत्री सीमा पाहावा, भावना पाणि, त्रिशला पटेल, श्रुती व्यास, प्रेरणा चावला, जया विराली यात काम करत आहेत. आर्ट सर्कलच्या वार्षिक सभासदाना ही नाटके त्यांच्या कार्ड वर पाहता येतील. आपल्या जागा त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत राखीव करून ठेवाव्यात. ज्यांनी सभासदत्व घेतले नाही रसिकांसाठी नाटकाच्या प्रवेशिका १ फेब्रुवारीनंतर उपलब्ध होतील. या संदर्भात अधिक माहितीसाठी आर्ट सर्कलशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

Story img Loader