Sharad Ponkshe in MNS Election Rally: सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या वेगवेगळ्या कसदार भूमिकांप्रमाणेच त्यांच्या परखड सामाजिक व राजकीय भूमिकांसाठीही ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी शरद पोंक्षेंनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्याकडे पक्षाच्या उपनेतेपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली. पण सोमवारी शरद पोंक्षे थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपीठावर अविनाश जाधव यांच्यासाठी प्रचाराचं भाषण करताना दिसले, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या भाषणात शरद पोंक्षेंनी तुफान राजकीय टोलेबाजी केली!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपनेते शिवसेनेचे, प्रचार मनसेचा!

शरद पोंक्षेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मनसेच्या प्रचारामागचं कारण सांगितलं. “मी शिवसेनेचा नावापुरता उपनेता आहे. अजूनही मी त्याच पक्षात आहे. पण मला मनसेच्या उमेदवारांचा प्रचार करावासा वाटला म्हणून मी इथे प्रचारासाठी आलो. जर ते कुणालाही पक्षात घेऊ शकत असतील, तर मग मी इथे का नाही येऊ शकत?” असा उलट प्रश्न त्यांनी यावेळी केला. तसेच, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात पक्षांनी एकमेकांची साथ सोडून विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी केलेल्या आघाडी वा युतीवरही त्यांनी टीका केली.

सांस्कृतिक मंत्र्यांवर टीका, सांगितला ‘तो’ किस्सा!

दरम्यान, भाषणात शरद पोंक्षेंनी आमदार-खासदारांबाबतही भाष्य केलं. “अभिनेते असल्यामुळे अनेकदा आमदार-खासदारांशी संबंध येतात. त्यांच्या गप्पा ऐकून अक्षरश: कीव येते. काहाही माहिती नसतं. शून्य वाचन, शून्य अभ्यास. एक आमदार ४ ते ५ लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे ४ ते ५ लाख लोकांना सूज्ञ करणारा, त्या ५ लाखांपेक्षा थोडा जास्त हुशार आमदार हवा ना? त्याला काहीतरी माहिती पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची निदान ढोबळ माहिती तरी माहिती पाहिजे. आपल्या राज्यातल्या सांस्कृतिक क्षेत्रात कोण काय करतंय याची थोडी तरी माहिती त्याला पाहिजे”, असं म्हणत शरद पोंक्षेंनी किस्सा सांगायला सुरुवात केली.

Sharad Ponkshe : “सत्तेसाठी एक अख्खा पक्ष…”, शरद पोंक्षेंचं मनसेच्या व्यासपीठावरून सत्ताधारी आणि विरोधकांवर हल्लाबोल

“भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षं झाली म्हणून मी आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. ७५ वर्षं झाली म्हणून एक कार्यक्रम करूयात अशी विनंती घेऊन मी गेलो. तिथल्या मीटिंगमधल्या कुणीतरी मला विचारलं की आता तुम्ही नथुराम करता की बंद झालं? मी म्हटलं बंद केलं ते नाटक. तेव्हा त्या सांस्कृतिक मत्र्यांनी मला विचारलं नथुराम म्हणजे? मी म्हटलं ज्यानं गांधीजींना गोळ्या मारल्या, गांधींची हत्या केली तो नथुराम. त्यावर ते म्हणाले, ‘पण ते तुम्हाला असं का म्हणाले?’ मी म्हटलं मी ती भूमिका २५ वर्षं करत होतो. तेव्हा त्या सांस्कृतिक मंत्र्यांनी मला आश्चर्यानं विचारलं अच्छा तुम्ही करत होतात?” असं पोंक्षे म्हणाले.

“३५ वर्षं काम करणाऱ्या नटाबद्दल…”

“महाराष्ट्रात मी नथुरामची भूमिका करतोय हे माहिती नसलेला असा कुणी असेल असं मला वाटत नाही. पण आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांना ते माहितीच नव्हतं. ३५ वर्षं या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि २५ वर्षं एखादी भूमिका साकारणाऱ्या एका नटाबद्दल ही माहिती आमच्या द ग्रेट सांस्कृतिक मंत्र्यांना होती. मग छोट्या कलाकारांबद्दल माहिती असणं फारच दुर्मिळ गोष्ट आहे”, अशा शब्दांत शरद पोक्षेंनी नाराजी व्यक्त केली.

“आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी असतात. तुम्हाला गाडीचं पेट्रोल जवळ-जवळ फुकटात दिलं जातं. तुम्हाला भत्ते, पगार आमच्या टॅक्समधून दिला जातो. जेणेकरून तुम्ही २४ तास आमच्यासाठी उपलब्ध असायला हवं. काही आमदार पाच वर्षं दिसलेच नाहीत असं ऐकायला मिळतं. लोकप्रतिनिधी हा शब्दच सगळे विसरून गेलेत. सगळ्यांना राजा झाल्यासारखं वाटतं. एकदा आमदार-खासदार झाले, एकदा सत्तेत आले की भाषा बदलते ‘मी दिलं’. तुम्ही काय दिलं?” असा सवाल शरद पोंक्षेंनी यावेळी केला.