पदवीधर मतदार संघासाठी मेहनत घ्या – आदित्य ठाकरे

राज्यात शिवसेनेची एक हाती सत्ता आणणे हेच आपले उद्दीष्ट आहे.

आदित्य ठाकरे (सांग्रहित फोटो)

राज्यात शिवसेनेची एक हाती सत्ता आणणे हेच आपले उद्दीष्ट आहे. केवळ विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक जिंकून हे लक्ष्य साध्य करता येणार नाही. त्यासाठी विधान परिषदेमध्ये संख्याबळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघात विजयसंपादन करायचाच या निर्धाराने प्रत्येक शिवसनिकांने विधान परिषद उमेदवाराचा नियोजनबध्द प्रचार सुरु करण्याचे आवाहन युवा सेनेचे अध्यक्ष आणि सेना नेते अदित्य ठाकरे यांनी महाड येथे शिवसनिकांच्या मेळाव्यात बोलताना केले.

कोकण पदवीधर मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी  महाड येथे शिवसनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहात झालेल्या या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री ना. अनंत गीते, खा. अनिल देसाई, आ. भरत गोगावले, सदानंद थरवळ, कोकण पदवीधर मतदार संघातील उमेदवार संजय मोरे, अ‍ॅड. राजीव साबळे, उपजिल्हाप्रमुख बिपीन म्हामुणकर, जिल्हा युवा अधिकारी विकासगोगावले, तालुकाप्रमुखसुरेश महाडीक, शहरप्रमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसनिक उपस्थित होते.

या निवडणुकीत शिवसेना शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होईल, असा विश्वास अदित्य ठाकरे यांनी यावेळेस व्यक्त केला. एकूण पदवीधर मतदारांपकी पन्नास टक्के मतदार नेंदणी शिवसेनेने केली आहे. मात्र, कुठेही गाफील न राहता, प्रत्येक शिवसनिकांने किमान २० मतदारांपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा श्री. ठाकरे यांनी यावेळेस व्यक्त केली.

युवा सेनेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे शिवसेनेच्या सिनेट सदस्यांच्या माध्यमातून मुंबई विद्यापिठात विद्यार्थ्यांची कामे वेळेवर होऊ लागली असल्याचेही ते म्हणाले. विधान परिषदेच्या पदवीधर आणिशिक्षक मतदार संघातील चारही जागा शिवसेना जिंकेल असा विश्वासही  श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदार संघातील उमेदवार संजय मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण सभापती म्हणून विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी दिली. या विधान परिषदेत निवडणुकीत शिवसनिक आणि युवा सनिक हेच आपल्या प्रचाराचे प्रभावी माध्यम असल्याचे ते म्हणाले. मेळाव्याचे सूत्रसंचलन सुधीर शेठ यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aditya thackeray

ताज्या बातम्या