शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वेदांता, बल्क ड्रग पार्कनंतर मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचं सांगितलं. आंदोलनात शिवसेनेच्या हजारो कार्यकत्यांनी हजेरी लावली. यावेळी आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.तुम्ही खोके घेऊन तुम्ही एकदम ओके झालात, पण आमच्या रोजगाराचं काय, असा प्रश्न तरुणांचा आहे. फक्त शिवसेनेच्या नाही, तर महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

हेही वाचा – पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे: भातखळकरांचा पवार, ठाकरेंवर निशाणा; शिवसैनिक म्हणाले, “केंद्रात, राज्यात, पुण्यात BJP सरकार”

नेमकं का म्हणाले आदित्य ठाकरे?

“राज्यातून अनेक प्रकल्प निघून जात आहेत. हे सत्य राज्यातील जनतेसमोर यावे यासाठी आजचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा जाहीर झाल्यानंतर राज्यभरातून लोक समर्थन देत आहेत. आज तळेगावात येताना मनात दुखं होते. आज महाविकास आघाडीचे सरकार असते. तर राज्यात वेदांन्ताचा प्रकल्प काहीही करून आणलाच असता. त्यामुळे आज इथे आक्रोश मोर्चाच्या जागी जल्लोष मोर्चा झाला असता” , अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

“मग प्रकल्प गुजरातला गेलाच कसा?”

“गेल्या दोन महिन्यात राज्यात रोजगाच्या संधी कुठेही दिसत नाहीत. मला या गोष्टीचे दुख नाही की प्रकल्प गुजरातला गेला. मात्र, महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे. आपण या देशाची आर्थिक राजधानी आहोत. अनेकदा आपण आपल्या मेहनतीच्या जोरावर राज्यात रोजगार खेचून आणला आहे. पण जो प्रकल्प १०० टक्के महाराष्ट्रात येणार होता, तो सरकार बदलताच गुजरात गेलाच कसा, याचे उत्तर शिंदे सरकारने द्यावे. वेदांन्तासंदर्भात जानेवारीमध्ये झूम कॉलवर आम्ही बैठक घेतली होती. त्यानुसार मी अनिल अग्रवाल यांना महाराष्ट्रात हवं तिथे प्रकल्प उभारा महाराष्ट्र सरकार तुम्हाला हवी ती मदत करण्यासाठी तयार आहे. असे सांगितलं होते. त्यानंतर मे मध्येही आमची बैठक झाली होती. त्यानंतर ८० हजार कोटींची गुतंवणूक आम्ही राज्यात आणली होती” , अशीही त्यांनी शिंदे सरकारवर केली.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मोठा खुलासा केला. “वेदांता, बल्क ड्रग पार्कनंतर मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प जो महाराष्ट्रात होणार होता तो आता महाराष्ट्राबाहेर जात आहे. खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतंय, याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

हेही वाचा – “या खोके सरकारचं लक्ष फक्त गटात…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!

“गुजरातबद्दल मला वाईट बोलायचं नाही. त्यांनी त्यांचे कर्तव्य केले. आपल्या राज्यात खोके सरकार असताना त्यांनी मौक्यावर चौका मारला आणि आपल्याकडे येणारा उद्योग त्यांच्या राज्यात नेला. मी गुजरात सरकारला याचा दोष देणार नाही. आपल्याच सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे” , असा आरोपही त्यांनी केला.