Aditya Thackeray Reaction on Rs 2000 Notes Withdrawn from Circulation : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. २०१६ साली केलेल्या नोटाबंदीनंतर हा दुसरा नोटबंदीचा निर्णय असल्याने याकडे सर्वस्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईच्या कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या वर्कशॉपला आज गेले होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आरबीआयने २ हजारच्या नोटा बंद केल्या आहेत, याकडे तुम्ही कशादृष्टीने पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले की, नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत आरबीआयने सतत पुढे मागे पुढे मागे केलं आहे. त्यामुळे त्यावर स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे.

sharad pawar devendra fadnavis (1)
“..तर त्यांनी किती कोलांटउड्या घेतल्या हे कळेल”, फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
shiv sena workers stopped narayan rane campaigning
रत्नागिरीत प्रचारपत्रकावरून भाजप-सेनेचे नाराजीनाटय
solapur, Rahul Gandhi, pm narendra modi, Rahul Gandhi Criticizes Modi, Favoritism Towards Industrialists, rahul gandhi in solapur, praniti shinde, solapur lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, solapur news, bjp, congress
लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल
manoj jarange
मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल

हेही वाचा >> RBI Withdrawn 2000 Rs : बँकेने दोन हजारच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला तर काय कराल? जाणून घ्या!

दरम्यान, वरळीतून निवडणूक लढवण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात हमरीतुमरी सुरू आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. “घटनाबाह्य मुख्यमंत्री वरळीतून लढणार असतील तर आता राजीनामा देतो. मुळात त्यांचं कोणी सरकारमध्ये ऐकत नाही, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मिंधेचा नालेसफाई दौरा म्हणजे राज्यात अगोदरच कीचड केला आहे आणि यात रस्ते घोटाळा, फर्निचर खरेदी घोटाळ्याबाबत भाजपच्या माजी नगरसेवकाxनी पत्र दिले आहे. गद्दार सरकारविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. जसं कर्नाटकमध्ये ४०% भ्रष्टाचार सरकार होतं. इथ १००% भ्रष्टाचारी सरकार आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई महापालिका, महापौर आणि इतर मुद्द्यांवरून हे एकमेकांशी भांडत आहेत. मुंबईत फर्निचर खरेदी, रस्ते घोटाळा झाला. पुणे , नाशिक महापालिकेत घोटाळे झाले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. “आमचे सरकार असताना कोणतेही वाद झाले नाही, जातीय दंगली झाल्या नाहीत. आता निवडणुकीच्या तयारी साठी हे वाद आणि दंगली होत आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.