Puja Khedkar row: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांचे एक एक कारनामे समोर येऊ लागले. अखेर यूपीएससीने त्यांचे सदस्यत्व रद्द केले. पूजा खेडकर प्रकरणानंतर एकूणच यूपीएससीच्या कारभारावर संशय व्यक्त केला गेला. पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. आता तर कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT) आणखी सहा अधिकाऱ्यांची यादी तयार केली असून त्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी आणि सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेयर आणि अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र देऊन यूपीएससी परिक्षेत यश मिळविले असा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला होता. त्यानंतर यूपीएससीकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. नुकतेच त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना भविष्यात यूपीएससी परीक्षेस बसण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता इतर अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
pune ips bhagyashree navtake marathi news
पोलीस उपायुक्त नवटक्के यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास ‘सीबीआय’कडे? ‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरण
jp nadda slams Kangana Ranaut marathi news
जे.पी. नड्डा यांच्याकडून कंगना यांची कानउघाडणी
gadchiroli, investigation, IAS officer Shubham Gupta
वादग्रस्त ‘आयएएस’ अधिकारी शुभम गुप्ताच्या अडचणीत वाढ, कार्यकाळातील सर्व प्रकरणांची होणार चौकशी…
national human rights commission orders police inquiry into detaining rti activist
माहिती अधिकार कार्यकर्त्याला केले नजरकैद; पोलिसांच्या चौकशीचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश
Like Pooja Khedkar 359 candidates grabbed the job
पूजा खेडकरप्रमाणे ३५९ उमेदवारांनी बळकावली नोकरी… आता फेरतपासणीत…

हे वाचा >> Suhas Diwase on Puja Khedkar : ‘मला त्यांनी रुममध्ये बोलावलं’, पूजा खेडकर यांचे लैंगिक छळाचे आरोप; जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले…

सहा अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी होणार

कार्मिक व प्रशिक्षण विभागाने आरोग्य सेवा महासंचालकांना पत्र लिहून अपंगत्व प्रमाणपत्र दाखवून सेवेत रूजू झालेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा तपासणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापैकी सहा अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यूपीएससीच्या नियमानुसार, अपंगांच्या राखीव कोट्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित उमेदवार कमीत कमी ४० टक्के अपंग असणे आवश्यक आहे. अशा दिव्यांग उमेदवारांना यूपीएससीकडून वयोमर्यादेत सूट, इतरांपेक्षा अधिकवेळा परीक्षा देण्याची सूट, तसेच परीक्षा केंद्र निवडण्यासारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.

हे ही वाचा >> IAS Puja Khedkar : फोटो बदलला, स्वाक्षरी, ईमेल, मोबाईल आणि आई-वडीलांचं नाव बदलून दिली परीक्षा; पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप

पूजा खेडकर यांचे अपंगत्व किती?

पूजा खेडकर यांनी नगरमधील जिल्हा रुग्णालयातून दोन वेळा अपंगत्व प्रमाणपत्र घेतले. पहिले प्रमाणपत्र त्यांनी २०१८ मध्ये दृष्टी अधू असल्याचे घेतले. त्यानंतर तेथूनच त्यांनी २०२० मध्ये मानसिक आजार असल्याचे प्रमाणपत्र घेतले. यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयाकडून अस्थिव्यंगाचे प्रमाणपत्र मिळविले. मात्र, त्यात त्यांना केवळ ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे दाखविण्यात आले. त्याच वेळी त्यांनी औंधमधील जिल्हा रुग्णालयातही प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचे समोर आले. अस्थिव्यंगासाठी वायसीएम रुग्णालयाने आधीच प्रमाणपत्र दिले असल्याने औंध रुग्णालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.

पूजा खेडकर यांच्या उमेदवारीबाबत UPSC ने केलेल्या कारवाईबाबत एएनआय वृत्तसंस्थेच्या एक्स पोस्टमध्ये माहिती दिली आहे. ‘यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना देण्यात आलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच, यापुढील काळात यूपीएससीकडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा त्यांना कधीच देता येणार नाही, असं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे’, अशी माहिती एएनआयच्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.