सीएनजीच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी रिक्षा-टॅक्सी चालक २६ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीतनंतर हा संप तत्वत: मागे घेत असल्याचं मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने स्पष्ट केलं आहे.

सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने मुंबईतील रिक्षा – टॅक्सी चालक १५ सप्टेंबरपासून संपावर जाणार होते. पण, १३ सप्टेंबर रोजी उदय सामंत यांची मुंबई टॅक्सी मेन्स युनियनसमवेत बैठक झाली आणि संप मागे घेतला. मात्र, बैठकीत शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा २६ सप्टेंबरपासून हा बेमुदत संपावर जाणार असल्याचं जाहीर केलं.

bmc swimming pool marathi news
मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले; २४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा
BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
Gurgaon Pure Hearts organization through informative counseling workshops and distribution of free menstrual cups for women
१० हजार महिलांचा सॅनिटरी पॅडला नकार, मेंस्ट्रुअल कप खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या ‘या’ संस्थेचा खास उपक्रम
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

त्याच पार्श्वभूमीवर आज ( २३ सप्टेंबर ) उदय सामंत यांची मुंबई टॅक्सी मेन्स युनियनसह बैठक पार पडली. या बैठकीत संप तत्वत: मागे घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. पुढील आठवड्यात एमएमआरटीएच्या बैठकीत भाडेवाढीवर अंतिम निर्णय होईल. त्यानंतर टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपये तर रिक्षाच्या भाड्यात दोन रुपये वाढ केली जाईल. १ ऑक्टोबरपासून नवी भाडेवाढ लागू करण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे.