scorecardresearch

Premium

“सहा महिन्यानंतर स्वाभिमानानं मंत्री म्हणून फिरणार”, भास्कर जाधवांनी व्यक्त केला निर्धार

“शिवसेना फोडल्यानंतर भाजपानं सहा ते सात सर्वे केले, पण…”, असेही भास्कर जाधवांनी सांगितलं.

bhaskar jadhav
भास्कर जाधव सिंधुदुर्गमध्ये बोलत होते. ( फेसबुक छायाचित्र )

शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी मोठं विधान केलं आहे. सहा महिन्यानंतर स्वाभिमानानं तुमचा भास्कर जाधव या भागांत मंत्री म्हणून फिरेल, असा निर्धार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांकडून राजकारणाचा स्तर खाली घसरवण्याचं काम देशपातळीवर सुरू आहे, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

भास्कर जाधव म्हणाले, “ही लढाई आपली, तुमची आणि माझीच आहे. फक्त सहा महिने उरलेत. सहा महिन्यांनी हा भास्कर जाधव या भागात, जिल्ह्यात आणि राज्यात स्वाभिमानानं आणि सन्मानानं मंत्री म्हणून फिरेल. त्यामुळे आजपर्यंत जशी साथ दिली. तशीच साथ द्यावी.”

ajit pawar
मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर असल्यानं नाराजीच्या चर्चा, अजित पवारांनी सोडलं मौन; म्हणाले, “आरे बाबा…”
Shrikant Shinde at varsha bungalow
वर्षा बंगल्यावरच्या कृत्रिम हौदात उतरुन श्रीकांत शिंदेंनी दिला लाडक्या गणरायला निरोप, मुख्यमंत्री म्हणाले…
uddhav thackeray rahul narvekar eknath shinde
आमदार अपात्रतेबाबत ‘या’ तारखेला प्रत्यक्ष सुनावणी; ठाकरे गट आरोप करत म्हणाला…
Jitendra Awhad and hasan mushrif
“बरगड्या मोडतील, नादाला लागू नका”, धनंजय मुंडेंच्या इशाऱ्याला जितेंद्र आव्हाड प्रत्युत्तर देत म्हणाले…

हेही वाचा : “माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर…”, सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

“मी जिथे उभा राहील त्याठिकाणी सगळेजण माझ्याविरोधात तुटून पडणार आहेत. मात्र, यांच्याविरोधात कुणीतरी लढलं पाहिजे. कोकणातल्या लाल मातीचा स्वाभिमान वेगळा आहे, हे लक्षात ठेवा,” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.

हेही वाचा : “यांना वाघनखे टोचतात अन् पेंग्विन घेऊन, हे…”, भाजपाची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका

“शिवसेना फोडल्यानंतर भाजपानं सहा ते सात सर्वे केले. सगळ्या सर्वेत मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचे सर्व नगरसेवक निवडून येतील. भाजपाचे फक्त २८ येतील. भाजपाचे शिवसेना धरून ४१ खासदार आहेत. पण, उद्या निवडणूक झाली, तर भाजपाचे सहा ते सात खासदार येतील, असा अहवाल आहे,” असा भास्कर जाधव यांनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After six month minister in konkan say bhaskar jadhav in sindhudurg ssa

First published on: 02-10-2023 at 15:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×