scorecardresearch

Premium

उदयनिधी स्टॅलिन यांच्यानंतर प्रकाश आंबेडकरांकडूनही सनातन धर्माबाबत ट्वीट; म्हणाले, “अस्पृश्यता…”

शनिवारी उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे”, असं स्टॅलिन म्हणाले.

prakash ambedkar on sanatan dharma
प्रकाश आंबेडकर सनातन धर्माबाबत काय म्हणाले? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी तुलना केल्याने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र व दक्षिणेचे प्रसिद्ध अभिनेते उदयनिधी स्टॅलिन सध्या बरेच चर्चेत आहेत. महाराष्ट्रातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तर, दुसरीकडे याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

शनिवारी उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असं विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केलं.

Rahul Narvekar and Ulhas Bapat
“क्षुल्लक निर्णय घ्यायला…”, १६ आमदार अपात्रतेप्रकरणी घटनातज्ज्ञ उल्हास बापटांची थेट राहुल नार्वेकरांवर टीका
prakash-ambedkar Uddhav Thackeray
“ठाकरेंबरोबर साखरपुडा झालाय, पण लग्नासाठी दोन भटजी…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले…
Chandrasekhar Bawankule apologized to Ajit Pawar
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची क्षमा मागितली, असं का केलं त्यांनी?
Mk Stalin Udaynidhi k ponmudi
‘इंडिया आघाडी सनातन धर्माच्या विरोधातच’, उदयनिधी यांच्यानंतर द्रमुकच्या मंत्र्यांवर भाजपाची टीका

हेही वाचा >> “काही लोक बालिश…”, सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना केल्यानंतर स्टॅलिनपुत्र उदयनिधींचं स्पष्टीकरण!

प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट काय?

“सनातन धर्म अस्पृश्यता मानतं. आम्ही याचा स्वीकार कसा करायचा?” असं ट्वीट प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. आता यावरूनही मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

उदयनिधींनी दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांच्या वाक्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. “मी पुन्हा सांगतो. मी फक्त सनातन धर्मावर टीका केली. सनातन धर्माचं उच्चाटन व्हायला हवं असं म्हणालो. मी ते पुन्हा म्हणेन. त्यांना माझ्याविरोधात जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत, ते त्यांनी करावेत”, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले आहेत. “भाजपा खोट्या बातम्या पसरवत आहे. सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीमुळे घाबरले असून लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After udayanidhi stalin prakash ambedkar also tweeted about sanatan dharma said untouchability sgk

First published on: 04-09-2023 at 12:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×