सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपने पुन्हा अॅड. शरद बनसोडे यांनाच उमेदवारी दिल्यामुळे शिंदे व बनसोडे यांची लढत पुन्हा दुस-यांदा होत आहे.
मागील २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी अॅड. बनसोडे यांचा ९९ हजार ६३२ मतांची आघाडी घेऊन पराभव केला होता. अॅड. बनसोडे हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळचे रहिवासी असून व्यवसायाच्या निमित्ताने ते मुंबईत स्थायिक झाले आहेत. ते स्वत: अभिनेते असून त्यांनी पद्मिनी कोल्हापुरे व भाग्यश्री पटवर्धन यांना सोबत घेऊन दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही केली होती. नवी कोरी पाटी व अभिनेता म्हणून बनसोडे यांना मागील निवडणुकीत उल्लेखनीय म्हणजे दोन लाख ८७ हजार ९५९ इतकी मते मिळाली होती. परंतु त्यानंतर त्यांनी सोलापूर मतदारसंघात पुन्हा भाजपच्या व्यासपीठावरून वावरणे टाळले. भाजपपेक्षा सावरकर विचार मंचच्या माध्यमातून सुरू असलेले सार्वजनिक कार्यही अलीकडे त्यांनी थांबविले होते. एवढेच नव्हेतर गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याची भूिमकाही जाहीर केली होती. त्यामुळे भाजपकडून उमेदवार कोण राहणार, याविषयी सार्वत्रिक उत्सुकता निर्माण झाली असतानाच अखेर अलीकडे जनसंपर्क नसला तरी सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात पुन्हा अॅड. शरद बनसोडे यांनाच उमेदवार म्हणून निवडणूक िरगणात आणले आहे.
या निवडणुकीत आम आदमी पार्टीने पूर्वाश्रमीच्या जनता दलाचे नेते ललित बाबर (मुंबई) यांना उमेदवारी दिली आहे. परंतु आम आदमीची शक्ती मर्यादित असल्यामुळे बाबर यांचा निभाव लागणे शक्य नसल्याचा अंदाज राजकीय जाणकार आतापासून वर्तवत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित
सोलापुरात शिंदेंविरोधात भाजपकडून पुन्हा बनसोडे
सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपने पुन्हा अॅड. शरद बनसोडे यांनाच उमेदवारी दिल्यामुळे शिंदे व बनसोडे यांची लढत पुन्हा दुस-यांदा होत आहे.

First published on: 15-03-2014 at 03:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Again bansode against shinde from bjp in solapur