सोलापुरात शिंदेंविरोधात भाजपकडून पुन्हा बनसोडे

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपने पुन्हा अ‍ॅड. शरद बनसोडे यांनाच उमेदवारी दिल्यामुळे शिंदे व बनसोडे यांची लढत पुन्हा दुस-यांदा होत आहे.

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपने पुन्हा अ‍ॅड. शरद बनसोडे यांनाच उमेदवारी दिल्यामुळे शिंदे व बनसोडे यांची लढत पुन्हा दुस-यांदा होत आहे.
मागील २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी अ‍ॅड. बनसोडे यांचा ९९ हजार ६३२ मतांची आघाडी घेऊन पराभव केला होता. अ‍ॅड. बनसोडे हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळचे रहिवासी असून व्यवसायाच्या निमित्ताने ते मुंबईत स्थायिक झाले आहेत. ते स्वत: अभिनेते असून त्यांनी पद्मिनी कोल्हापुरे व भाग्यश्री पटवर्धन यांना सोबत घेऊन दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही केली होती. नवी कोरी पाटी व अभिनेता म्हणून बनसोडे यांना मागील निवडणुकीत उल्लेखनीय म्हणजे दोन लाख ८७ हजार ९५९ इतकी मते मिळाली होती. परंतु त्यानंतर त्यांनी सोलापूर मतदारसंघात पुन्हा भाजपच्या व्यासपीठावरून वावरणे टाळले. भाजपपेक्षा सावरकर विचार मंचच्या माध्यमातून सुरू असलेले सार्वजनिक कार्यही अलीकडे त्यांनी थांबविले होते. एवढेच नव्हेतर गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याची भूिमकाही जाहीर केली होती. त्यामुळे भाजपकडून उमेदवार कोण राहणार, याविषयी सार्वत्रिक उत्सुकता निर्माण  झाली असतानाच अखेर अलीकडे जनसंपर्क नसला तरी सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात पुन्हा अ‍ॅड. शरद बनसोडे यांनाच उमेदवार म्हणून निवडणूक िरगणात आणले आहे.
या निवडणुकीत आम आदमी पार्टीने पूर्वाश्रमीच्या जनता दलाचे नेते ललित बाबर (मुंबई) यांना उमेदवारी दिली आहे. परंतु आम आदमीची शक्ती मर्यादित असल्यामुळे बाबर यांचा निभाव लागणे शक्य नसल्याचा अंदाज राजकीय जाणकार आतापासून वर्तवत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Again bansode against shinde from bjp in solapur

ताज्या बातम्या