औरंगाबादेतील शिंदे गटाच्या मेळाव्यात शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “एक मुख्यमंत्री पडद्याआड राहायचे, तर एक जनतेत राहतात” असा खोचक टोला सत्तार यांनी ठाकरेंना लगावला आहे. शिंदे गटात आणखी चार ते सहा आमदार आणि दोन खासदार येणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. “मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल”, असा आत्मविश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उद्धव ठाकरेंनी CM शिंदेंचं नेतृत्व मान्य करत जुळवून घ्यावं, कारण…”; शिंदे गटातील अब्दुल सत्तारांचा सल्ला

कार्यकर्त्याला कधीच कोणाची भीती नसते. कार्यकर्तापद कधीही कोणीही हिसकावू शकत नाही, असे सत्तार या मेळाव्यात म्हणाले आहेत. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून जुळवून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. या सल्लानंतर सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. खरी शिवसेना कोणाची हे दसरा मेळाव्यात कळेल, असेही सत्तार शिंदे गटाच्या मेळाव्यात म्हणाले आहेत.

“असल्या फालतू…”, अजित पवारांचं अब्दुल सत्तारांवर टीकास्र; ‘त्या’ विधानावरून सुनावलं!

परभणी दौऱ्यावर असताना जाहीर सभेत बोलताना सत्तार यांनी शिंदे गटात पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार येणार असल्याचा दावा केला होता. याच दाव्याचा आज औरंगाबादेत त्यांनी पुनरुच्चार केला आहे. या आमदार आणि खासदारांच्या नावांबाबत अद्याप अस्पष्टता आहे. शिंदे गटात आणखी कोणत्या मतदारसंघातील आमदार, खासदार प्रवेश करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture minister abdul sattar commented on uddhav thackrey and shivsena mla rvs
First published on: 30-09-2022 at 15:37 IST