“युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी जो आमच्या कपाळावर ...”; संजय राऊतांना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर! | Agriculture Minister Abdul Sattar responded to Sanjay Rauts criticism rno news msr 87 | Loksatta

“युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी जो आमच्या कपाळावर …”; संजय राऊतांना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर!

“…त्याचा त्यांना कदाचित पश्चाताप होत असेल तर तेच पाहावं.” असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.

“युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी जो आमच्या कपाळावर …”; संजय राऊतांना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर!
(लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तुमच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तो कधीही पुसला जाणार नाही, अशा स्वरुपाचं विधान शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना उद्देशून केलं होतं. यावर शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, “२०१९ मध्ये यांनी युती तोडून आणि महाविकास आघाडीसोबत जाऊन जो आमच्या कपाळावर शिक्का बसवलाय तोच अजुन मिटला नाही. तर आणखी नवीन कुठून येईल?, त्यांच्या माथ्यावर जे लिहिलेलं आहे तेच आमच्या माथ्यावर, २०१९ मध्ये महाविकास आघाडी करताना, ज्या युतीमध्ये आम्ही निवडून आलो आणि त्यांना धोका देऊन जे सरकार स्थापन केलं. त्याचा त्यांना कदाचित पश्चाताप होत असेल तर तेच पाहावं, मध्ये काहीदिवस ते राहिले होते(तुरुंगात) तेव्हा त्यांना झाला असं मला वाटतं.”

हेही वाचा – हिंदूंच्या विवाहाबाबत वादग्रस्त वक्तव्यावर खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

याशिवाय, “भाजपा आणि मुख्यमंत्री हे एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतात. त्यामुळे कोणीही बॅकफूटवर नाही, कोणीही नाराज नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेहीजण समन्वयाने सरकार चालवत आहेत. या परिणाम आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसेल. या निवडणुकांमध्ये आमची पहिली परीक्षा होईल. मला वाटतं की देवेंद्र फडणवीसांचा अनुभव व केंद्र सरकारचा मोठा पाठिंबा आम्हाला निधीच्या माध्यमातून आम्हाला मिळतोय. भाजपाचे मी मनापासून आभार मानेल, की त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांची निवड केली. चालत्या, फिरत्या कार्यकर्त्यालाही मुख्यमंत्रीपद मिळून शकतं, असा निर्णय मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला.” असंही यावेळी

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 18:14 IST
Next Story
“आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या…”, मनसे आमदार राजू पाटलांची सुषमा अंधारेंवर बोचरी टीका