सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी बजावलेल्या खेळाडूंना गौरवार्थ देण्यात आलेले ब्लेझर आखूड असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी प्रशासकीय चौकशी समिती नेमली खरी; परंतु विद्यापीठ प्रशासनाने या समितीला डावलून स्वतःच्या अधिकारात दुसरी समिती गठित केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष चौकशी आणि कारवाईला विलंब होत असल्याने विद्यापीठाचा कारभार वादात सापडला आहे.

क्रीडा दिनानिमित्त २९ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित आंतरविद्यापीठ स्पर्धेत कामगिरी केलेल्या व सहभागी विद्यापीठाच्या खेळाडूंचा गौरव ब्लेझर देऊन झाला होता. हे ब्लेझर ८२ खेळाडूंबरोबरच त्यांचे प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनाही दिले होते. परंतु हे ब्लेझरच सदोष आणि आखूड शिवले गेले होते. याबाबत विद्यापीठ अधिसभा सदस्य ए. बी. संगवे यांनी २४ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या अधिसभा बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेनंतर चौकशी करून, संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करायची यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या घटनेला तीन महिने झाले तरीही ही समिती गठित केल्याचे किंवा समितीची बैठक असल्याचे पत्र संबंधिताना पाठविले गेले नव्हते.

OBC students are not yet eligible for the benefit of Aadhaar scheme
ओबीसी विद्यार्थांना आधार योजनेचा लाभ अद्याप नाहीच, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Primary teachers committee alleges that educational materials are being distributed to government schools under the name of Asr
‘असर’च्या नावाखाली शैक्षणिक साहित्य सरकारी शाळांच्या माथी, प्राथमिक शिक्षक समितीचा आरोप…
Skill-based education is the door to development says Haribhau Bagde
कौशल्याधारित शिक्षणातूनच विकासाचे दार – हरिभाऊ बागडे
dr panjabrao deshmukh krishi Vidyapeeth
अकोला : आचार्य पदवी व पारितोषिकांचे सामूहिक वितरण! ‘डॉ.पं.दे.कृ.वि.’च्या दीक्षांत समारंभात शिष्टाचाराला फाटा
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
chairperson state women commission rupali chakankar on alandi unauthorized warkari educational institution
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर दोन दिवसांत करवाई करा; राज्य महिला आयोगाच्या सूचना
विद्यापीठातील निकालांची रखडपट्टी; नव्याने निकाल तयार करण्याची वेळ

हेही वाचा >>>Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव

या संदर्भात समितीचे सदस्य संगवे यांनी या समितीची कार्यवाही कुठपर्यंत आली आहे, असे कुलगुरू व कुलसचिव यांना १७ नोव्हेंबर २०२४ रोजी लेखी कळविले होते. याबाबत कुलसचिव घारे यांनी, समिती स्थापन केली आहे. समितीच्या बैठका घेतल्या आहेत. लवकरच त्यांच्याकडून अहवाल सादर केला जाईल. त्यांना लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली आहे, असे उत्तर दिले होते.

या संदर्भात अधिसभेत प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड व अधिसभा सदस्य सदस्य ए. बी. संगवे यांची समिती नेमली होती. परंतु अधिसभेत ठरल्याप्रमाणे एकाही समिती सदस्याला या समितीची बैठक झाल्याचे माहिती नव्हते. प्रत्यक्षात समिती सदस्य असलेले व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी समितीची मीटिंग झाल्याचे खंडन केले होते.

हेही वाचा >>>Arjun Khotkar : “कैलास गोरंट्याल यांची दुकानदारी मी बंद करणार”, अर्जुन खोतकर यांचा थेट इशारा

प्रशासकीय समिती नेमली- कुलगुरू

विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत प्रश्नोत्तराच्या तासात झालेली चौकशी समिती ही नियमाप्रमाणे गठित होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही प्रशासकीय समिती नेमली आहे. त्यांच्याकडून माहिती घेतली असता काही ब्लेझर आखूड झाले होते, काही अदलाबदली झाली होती. याची कार्यवाही संबंधित ठेकेदाराने केली आहे. –प्रा. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

ब्लेझर मिळालेल्या सर्व खेळाडूंना कळवा

अधिसभेत झालेला निर्णय बदलणे चुकीचे आहे. ब्लेझर मिळालेल्या सर्व खेळाडू-विद्यार्थ्यांना ब्लेझरबाबत काही तक्रारी असल्यास कळवावे, असे पत्र विद्यार्थ्यांना पाठवले नसल्याचे संबंधित प्रशासकीय समिती सदस्यांच्या निदर्शनास मी आणून दिले आहे. तसे पत्रही विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे.  -प्रा. सचिन गायकवाड, सदस्य, व्यवस्थापन परिषद

अधिसभेला डावलणे संशयास्पद

विद्यापीठ अधिसभेने घेतलेला निर्णय नियमांच्या चौकटीत बसत नसेल तर कुलगुरूंनी त्याबद्दल सभेतच स्पष्ट करणे गरजेचे होते. नंतर स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय समिती गठित करणे संशयास्पद वाटते. –ए. बी. संगवे, सदस्य, अधिसभा

Story img Loader