अहिल्यानगरः काल, मंगळवारी ढगफुटीसदृश झालेल्या अतिवृष्टीने अहिल्यानगर तालुक्यातील ४५ गावांची दाणादाण उडाली. तेथील सुमारे ४ हजार २०० शेतकऱ्यांचे २ हजार ९०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या अशी तब्बल ३ हजार ३४१ पशुधन मृत्युमुखी पडले. १२४ घरांची पडझड झाली. छोटे-मोठे ११ बंधारे फुटले. तब्बल १२ हजार २८७ टन चाळीतील कांद्याचे लाखो रुपयांचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, बुधवारी नुकसानग्रस्त अकोळनेर, खडकी, वाळकी गावांची पाहणी करत युद्धपातळीवर पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच आपत्ती काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीर असून, नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाहीत, असे आश्वासन दिले.

तहसीलदार संजय शिंदे यांनी प्राथमिक नुकसानीचा अंदाज जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यामार्फत पालकमंत्र्यांना सादर केला. पाहणीच्या वेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. आशिया जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे आदी उपस्थित होते.

तालुका महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सारोळा कासार येथे ५, अकोळनेर येथे ४, चिचोंडी पाटील व वाघदरा येथे एक बंधारा फुटला. खडकी येथे दोन पूल वाहून गेले. यासह ६१ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्यामध्ये रस्त्यांसह अंगणवाडी, महावितरणचे वीजखांब व रोहित्र, स्मशानभूमी याचा समावेश आहे.

मागील ५० ते ६० वर्षानंतर एकाच दिवसात १०० मिमी.पेक्षा अधिक पाऊस झाल्याने नागरिकांच्या अतोनात नुकसान झाले. तातडीने पंचनामे करण्यासाठी जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील मनुष्यबळ उपयोगात आणावे. खराब झालेले रस्ते, बंधारे तातडीने दुरुस्त करावीत. वीजप्रवाह सुरळीत करावा, अशा सूचनाही पालकमंत्री विखे यांनी दिल्या. ज्या गावातील ओढे, नदीचा प्रवाह अतिक्रमणामुळे बदलला असेल त्या ठिकाणच्या अतिक्रमणे तातडीने काढण्याची सूचनाही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डबक्यात पडून मुलाचा मृत्यू

चास शिवारात घराजवळ साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात पडल्याने एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. अमितेश बलराज बिडे (वय १०, रा. चास) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमितेश हा घराजवळ पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या डबक्यात पडला. त्याच्या नातेवाईकांना ही घटना कळताच त्यांनी त्याला बाहेर काढले. तो बेशुद्ध झाल्याने त्याचे चुलते जयसिंग बिडे यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. पोलीस अंमलदार जे. डी. जंबे हे तपास करत आहेत.(चौकट२)चास मंडलात ५ तासांत ४.६६ इंच पाऊसनगर शहरातील सावेडी व केडगावसह तालुक्यातील वाळकी व चास या चार मंडळांत चार ते पाच तासांतच ४.५ इंचापेक्षा अधिक पाऊस झाला. चासमध्ये११८.३ मिमी. वाळकीत ११०.५, सावेडीत ८७ मिमी. केडगाव मंडलात १००.५ मिमी. पाऊस झाला.