चारित्र्याच्या संशयावरुन झालेल्या वादातून महिलेने सासऱ्याला संपवलं; डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

या प्रकरणामध्ये पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचं सांगण्यात आलंय.

crime
पोलिसांनी महिलेला केली अटक

नगर तालुक्यातील जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सून व सासरा यांच्यात चारित्र्यच्या संशयावरून वाद झाला. या वादामध्ये सुनेने सासऱ्याला लोखंडी कुऱ्हाड आणि दगडाने मारहाण केली आहे. याच मारहाणीमध्ये सासऱ्याचा मृत्यू झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार ६३ वर्षीय अर्जुन हजारे असं मरण पवालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर या प्रकरणामधील आरोपी महिलेचं नाव ज्योती हजार असं आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता अर्जुन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. सदर गुन्हामध्ये आरोपी महिलेला अटक केली असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ahmadnagar crime women killed father in law scsg

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या