अहमदनगरमध्ये आज एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. येथील जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला. तर, अन्य काहीजण जखमी देखील झाले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्याचं समोर आलं आहे. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते आणि हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; १० रुग्णांचा मृत्यू

Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
pune election duty marathi news, pune election training marathi news
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
Nitin Gadkari Urges Chandrapur Voters to Elect Development-Focused Candidate Sudhir Mungantiwar
‘‘जाती-धर्मापेक्षा विकासाला प्राधान्य द्या,” नितीन गडकरी यांचे मतदारांना आवाहन
Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून, तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी देखील मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.

अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. असं नाना पटोले यांनी ट्विट केलेलं आहे.