नगर तालुका पोलिसांची कामगिरी, मध्यस्थ आणि व्यापाऱ्याला अटक

नगर : संत्रा उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक झालेली १४ लाख ५० हजाराची रक्कम नगर तालुका पोलिसांनी शेतकऱ्याला पुन्हा मिळवून दिली. फसवणूक करणाऱ्या मध्यस्थासह पश्चिम बंगालमधील व्यापारी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या घटनेच्या निमित्ताने फसवणुकीचा नवाच प्रकार उघडकीला आला आहे.

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

अमोल ज्ञानेश्वर फुटाणे (वरुड, अमरावती) व मायनुल इस्लाम करीम इस्लाम (नॉर्थ परगाणा, पश्चिम बंगाल) या दोघांना नगर शहरातून अटक करण्यात आली. या दोघांनाही न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहेत.  यापूर्वी नगरमधील कांदा व्यापाऱ्यांची कर्नाटक, पश्चिम बंगालमधील व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. या फसवणुकीच्या घटनांत विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला खरेदीची रक्कम दिली जाई. नंतर मोठय़ा प्रमाणावर माल उचलून फसवणूक केली जाई. मात्र संत्रा उत्पादकांबाबत घडलेल्या घटनेत मात्र फसवणुकीचा नवाच प्रकार उघडकीला आला.

वाळकी येथील शेतकरी संदीप मधुकर तावरे यांनी पश्चिम बंगालमधील व्यापाऱ्याला संत्रा विक्री केली. त्यासाठी अमोल फुटाणे हा मध्यस्थ होता. त्याच्यामार्फत तावरे यांच्याकडे संत्रा खरेदीसाठी संपर्क साधला गेला. पश्चिम बंगालमधील व्यापारी मायनुल इस्लाम यांनी तावरे यांच्या वाळकी येथील शेतातून १४ लाख ५० हजार रुपये किमतीची संत्रा खरेदी केली. संत्र्याच्या गाडय़ा भरल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर १४ लाख ५० हजार रुपये आरटीजीएस द्वारे पाठवले. आयसीआयसीआयह्ण बँकेने तावरे यांना आरटीजीएसचा संदेश पाठवला. मात्र पैसे जमा होण्याच्या या प्रक्रियेत चोवीस तासाचा अवधी लागतो.  त्यानंतर संत्रा गाडय़ा महाराष्ट्र राज्याबाहेर जाताच दोघा व्यापाऱ्यांनी वाळकी येथील शेतकरी तावरे यांचे बँक अकाउंट होल्ड केले. त्यासाठी बँकेला चुकीच्या खात्यावर पैसे पाठवल्याचा संदेश देऊन हे बँक खाते होल्ड केले. त्यामुळे तावरे यांना बँकेमधून पैसे काढता आले नाहीत.

२८ फेब्रुवारीला ही घटना घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संदीप तावरे यांनी तातडीने नगर तालुका पोलिसांची संपर्क केला. सहायक पोलीस निरीक्षक सानप यांच्या पथकाने तातडीने शोध मोहीम राबवून दोघांना अटक केली. दोघांकडून संदीप तावरे यांचे १४ लाख ५० हजार रुपये पोलिसांनी परत मिळवून दिले.