श्रीगोंद्यात गावगुंडाकडून अल्पवयीन मुलीला मारहाण

आरोपीला अजूनही पसारच

आठवडाभरानंतर चार जणांविरोधात विनयभंग, अॅट्रॉसिटी आणि पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

अहमदनगरमधील श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीला भररस्त्यात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीचा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तब्बल आठवडाभरानंतर चार जणांविरोधात विनयभंग, अॅट्रॉसिटी आणि पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही.

श्रीगोंदा येथील पारगावमधील मडकेवाडीत राहणाऱ्या पीडित मुलीचे आजीआजोबा रस्त्यावरुन जात असताना सुनील बोनगेने त्यांना अडवले. रस्ता बंद झाला असून तुम्ही दुसऱ्या मार्गाचा वापर करा असे त्याने सांगितले. पीडित मुलीचे कुटुंब नियमितपणे त्याच रस्त्यावरुन जात असल्याने बोनगे त्याच्या दोन मुलांसह २१ जूनरोजी पीडित मुलीच्या घरी गेला. पीडित मुलींच्या आई- बाबांशी बोलताना असभ्य भाषेचा वापर झाल्याने मुलीचा पाराही चढला. तिने बोनगेला प्रत्युत्तर दिले. मुलगी बोलल्याने बोनगेचा अहंकार दुखावला. त्याने पीडित मुलीला भररस्त्यात मारहाण आणि शिवीगाळ केली. मुलीचे कुटुंबीयाने या घटनेची शुटींग केले. या व्हिडीओत बोनगे आणि त्याच्या अल्पवयीन मुलांची गुंडवृत्ती दिसते.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी श्रीगोंदामधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून त्यांनी व्हिडीओ पोलिसांना दाखवला. पोलिसांनी बोनगे आणि त्याच्या मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप आरोपींना अटक न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ahmednagar shrigonda minor girl beaten and molested on road video viral