ओवैसींवर कारवाई करणाऱ्या फौजदाराला पाच हजारांचे बक्षीस

ओवैसी यांना दंड आकारणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सोलापूर : विना वाहन क्रमांक वाहनातून प्रवास केल्याबद्दल ‘एमआयएम’चे सर्वोच्च नेते खासदार असदोद्दीन ओवैसी यांना दंड आकारणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

खासदार ओवैसी हे काल सोलापुरात पक्षाच्या मेळाव्यासाठी आले होते. या मेळाव्यासाठी जात असताना त्यांच्या मोटारीला वाहन क्रमांक असलेली पाटीच नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश चिंताकिंदी यांना आढळले.

या वरून त्यांनी ओवैसी यांचे वाहन अडवले आणि दंड भरण्यास सांगितले. ओवैसी यांनी देखील हा दंड लगेच भरला तसेच वाहनात ठेवलेली वाहन क्रमांकाची पाटी बसवण्यास सांगितले. दरम्यान कुठलेही दडपण न बाळगता ही कारवाई केल्याबद्दल पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी संबंधित अधिकारी चिंताकिंदी यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aimim chief asaduddin owaisi fined in maharashtra for no number plate on car zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या