scorecardresearch

Premium

“भाजपाची बी टीम तयार, रावसाहेब दानवेंची कबुली”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची टीका

लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून डॉ. भागवत कराड यांना जिंकवायचं असेल तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवंणे आवश्यक आहे, असं वक्तव्य भाजपा नेते रावसाहेब दानवी यांनी केलं आहे.

Raosaheb Danve Imtiyaz Jaleel
रावसाहेब दानवे – इम्तियाज जलील

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी भाजपा अनुकूल असल्याचं बोललं जात आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधून डॉ. भागवत कराड यांना निवडून आणायचं असेल तर ‘एमआयएम’च्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवणं आवश्यक आहे, तशी आमची दोस्ती आहे, असं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इ्म्तियाज जलील हे दानवे यांच्या शेजारीच बसले होते.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ शिवसेना-भाजपाची युती असताना असताना शिवसेनेच्या ताब्यात होता. शिवसेनेमध्ये आता दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट भारतीय जनता पार्टीबरोबर महायुतीत आणि राज्यातल्या सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिंदे गटाकडे जाईल असं बोललं जात होतं. परंतु ही जागा भारतीय जनता पार्टीची असून आपण इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

Ajit Pawar group washim
वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात नाराजीनाट्य! सहकारमंत्र्यांच्या समोरच…
uddhav thackeray bjp flag
भाजपाकडून ६-७ दिग्गज आमदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची चर्चा, ठाकरे गटाचे खासदार म्हणाले…
bjp mp ramesh bidhuri video loksabha
Video: “ए भ**, दहशतवादी..बाहेर फेका याला”, भाजपा खासदाराची लोकसभेत शिवीगाळ; राजनाथ सिंहांनी मागितली माफी!
Chandrashekhar Bawankule Eknath Khadse
“एकनाथ खडसे रावेरमधून लोकसभा निवडणूक लढले तर…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य चर्चेत

छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद – पूर्वीचं नाव) गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना तीन लाख ८८ हजार ७८४ मतं मिळाली होती. तर प्रतीस्पर्धी उमेदवार चंद्रकांत खैरे (शिवसेना) यांना तीन लाख ८४ हजार ५५० मतं मिळाली होती. अवघ्या चार हजार मतांनी खैरे यांचा पराभव झाला होता. भाजपाने या मतदारसंघात शिवसेनेला मदत केली नाही, असा आरोप ठाकरे गटाने सातत्याने केला आहे. त्याचबरोबर एमआयएमला काँग्रेसने नेहमीच भाजपाची बी टीम म्हटलं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसने एमआयएमवर टीका केली आहे.

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच काँग्रेसने म्हटलं आहे की, भाजपाने कशी बी टीम तयार करून ठेवली आहे याची जाहीर कबुलीच रावसाहेबांनी दिली आहे.

हे ही वाचा >> आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी नोटिसची वेळ संपली, कारवाई कधी? राहुल नार्वेकर म्हणाले…

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचं ‘गणित’

या लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या चार लाख १५ हजार इतकी आहे. अनुसूचित जाती व जमातीचे मतदार तीन लाख ७७ हजार इतके मतदार आहेत. तर मराठा मतदारांची संख्या ५.५० लाखांच्या घरात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aimim is bjps b team says congress raosaheb danve imtiyaz jaleel video asc

First published on: 23-08-2023 at 14:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×