AIMIM Winning Candidate List: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. हैदराबादचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षाही अधिक जागा एमआयएम पक्षाने जिंकल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेतही त्यांनी सहा जागा जिंकत प्रवेश केला आहे.
मुंबई महानगरपालिकेत जिंकलेल्या जागा
वॉर्ड क्र. १३४ – मेहजबिन खान
वॉर्ड क्र. १३६ – जमीर कुरेशी
वॉर्ड क्र. १३७ – समीर पटेल
वॉर्ड क्र. १३८ – रोशन शेख
वॉर्ड क्र. १३९ – शबाना शेख
वॉर्ड क्र. १४५ – खैरुनिसा हुसेन
सायंकाळी ६ वाजेपर्यंत हाती आलेल्या यादीनुसार एमआयएम पक्षाने ९४ जिंकल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच काही जांगावर एमआयएम पक्ष आघाडीवर होता. त्यामुळे विजयी उमेदवारांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, असे सांगितले जाते.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत २०१७ साली एमआयएमचे २५ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी एमआयएमचे उमेदवार निवडून येणार नाहीत, असे दावे भाजपा आणि शिवसेनेकडून (शिंदे) करण्यात आले होते. मात्र माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रचारात महायुतीवर जोरदार टीका करत एमआयएमचे उमेदवार निवडून न आल्यास मी दाढी काढेन, असे सांगितले होते.
राष्ट्रवादी (शरद पवार), मनसेपेक्षाही जास्त जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने राज्यात सायंकाळपर्यंत २९ जागा जिंकल्या होत्या, तर मनसेला केवळ १७ जागा जिंकण्यात यश आले. तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला १४ जागा मिळाल्या आहेत.
मुस्लीम मते खेचण्यात यश
यापूर्वी मुस्लीम मतांची विभागणी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात होताना दिसत होती. मात्र यंदाच्या निकालावरून असे दिसते की, मुस्लीम मते एमआयएमकडे एकवटली. समाजवादी पक्षाला एमआयएमने मोठा धक्का दिला असून समाजवादी पक्षाच्या वॉर्डात एमआयएमने विजय मिळवला आहे.
कोणत्या महानगरपालिकेत किती नगरसेवक विजयी झाले?
छत्रपती संभाजीनगर – २४
मालेगाव – २०
सोलापूर – ८
धुळे – ८
नांदेड – ८
मुंबई – ६
अमरावती – ६
ठाणे – ५
नागपूर – ५
जालना – २
