Ajit Doval Lokmanya Tilak Award: राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील योगदानासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अमित शाहांनी यावेळी लोकमान्य टिळकांच्या देशाच्या स्वातंत्र्यातील योगदानाचा आढावा घेतला. लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी अजित डोवाल यांची निवड केल्याबद्दल शाहांनी टिळक स्मारक ट्रस्टचे आभार मानले. गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, यांच्यासह भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टिळकांच्या योगदानाचा आढावा

“लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्याची याच मातीत घोषणा केली. युवकांनी टिळकांचे श्रीमद्भगवद्गीतारहस्य वाचले तर ते आयुष्यात कधी चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत. इंग्रज केसरी आणि मराठा वृत्तपत्रांना घाबरत होते. लोकमान्य टिळकांचे लिखाण कधीच कालबाह्य होणार नाही, ते शाश्वत आहे”, त्याचे वाचन करण्याचे आवाहन टिळकांनी युवकांना केले. लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची निवड केल्याबद्दल शाहांनी टिळक स्मारक ट्रस्टचे आभार मानले.

गुजरातमधील बॉम्बस्फोटचा संदर्भ

“मी गुजरातचा गृहमंत्री असताना साखळी बॉम्बस्फोट झाले होते, त्यावेळी माझी आणि त्यांची ओळख नव्हती. पण, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी केवळ बॉम्बस्फोट नाही तर त्यामागे असणारे लोक आणि देशात झालेल्या बॉम्बस्फोटांचा तपास करण्याचे सांगितले आणि यासाठी डोवाल यांची मदत घेण्याचा सल्ला मोदींनी दिला. डोवाल आणि माझी चर्चा झाली. यावेळी डोवाल यांनी दिलेल्या टिप्समुळे गुजरात पोलिसांनी अहमदाबादच नव्हे तर देशातील १३ बॉम्बस्फोटांचा यशस्वीपणे तपास केला होता”, अशी आठवण अमित शाहांनी यावेळी सांगितली. “पंतप्रधान मोदींनी सर्वांत पहिल्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निवडीचा निर्णय घेतला होता. आजचे परराष्ट्र धोरण देशाचा पाठीचा कणा झाली आहे. डोवाल यांना देशाचे सर्वाधिक राहिलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ठरले आहेत”, असे शाह म्हणाले.

डोवाल यांच्या योगदानाचे कौतुक

“लष्कराची क्षमता वाढविण्यात आणि त्यात अमूलाग्र बदल पंतप्रधान मोदींनी गेल्या १२ वर्षात गेला आहे. यात अजित डोवाल यांचे मोठे योगदान आहे. शुद्ध आणि जन्मजात देशभक्ताचा सन्मान केला आहे”, अशा शब्दात शाहांनी डोवाल यांच्या कतृत्वाचे आणि योगदानाचे कौतुक करत पुरस्कारासाठी टिळक स्मारक ट्रस्टचे देखील आभार मानले.